धाराशिव जिल्ह्यात चोरीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

धाराशिव  : घाटंग्री, ता. धाराशिव येथील- उमेश वामन शिंदे यांच्या बंद घराच्या पाऱ्यावरुन घरात येऊन दरवाजाची कडी अज्ञात व्यक्तीने दि. 21.03.2023 रोजी 22.00 ते 22.15 वा. दरम्यान उघडून घरात प्रवेश करुन आतील पेटीतील  सुवर्ण दागिने व रोख रक्कम 35,000 ₹ असा एकुण 2,00,000 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या उमेश शिंदे यांनी दि.22.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : भोसले हायस्कुल, धाराशिव येथील- बसचालक-धनंजय कुंडलिक बिटे हे दि. 21.03.2023 रोजी 11.00 ते दि.22.03.2023 रोजी 05.30 वा पुर्वी तेर बसस्थानक येथे बस उभी केली असता बसमधील अंदाजे 13020 ₹ किंमतीचे डिझेल 140 लि. तसेच तेर येथील -विकास रामकृष्ण भोरे यांच्याही टेम्पो मधील  अंदाजे 4,650 ₹ किंमतीचे डिझेल 50 लि. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या धनंजय बिटे यांनी दि. 22.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : करजकल्ला, ता. कळंब येथील- उमेश विष्णू चाळक यांची अंदाजे 35,000 ₹ किंमतीची हिरो स्पेलंन्डर प्लस मोटरसायकल, क्र.एम.एच.25 ए.एम. 6916 व ही  दि.21.03.2023 रोजी 20.30 ते 20.45 वा. दरम्यान आदि पोटोबा बियर बार हॉटेल समोर ढोकी रोड डिकसळ येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या उमेश चाळक यांनी दि.22.03.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web