धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल
नळदुर्ग :आरोपी नामे-1) सोहेल कुरेशी, 2) नासीर कुरेशी, दोघे रा. कुरेशी गल्ली नळदुर्ग ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी दि.25.08.2023 रोजी 22.30 वा. सु. बालाघाट कॉलेज नळदुर्गचे समोरील सर्व्हिस रोडवर फिर्यादी नामे- वसीम अलोमुद्दीन सय्यद, वय 37 वर्षे, रा. भवानी नगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद यांना जागेच्या वादाचे कारणावरुन व मामावर केस का केली याचा राग मनात धरुन नमुद आरोपीतांनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्याने उजवे हातावर,छातीत, पाठीत मारहण करुन जखमी केले. व उजवे हाताचे मनगटाचे जवळ हाड फॅक्चर केले, तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी वसीम सय्यद यांनी दि.10.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-325, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी :आरोपी नामे-1)धनाजी मोटे, 2) चेतन मोटे, 3) विष्णू धनाजी मोटे, 4) अनुसया धनाजी मोटे, सर्व रा. गोंधळवाडी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी दि.10.09.2023 रोजी 12.30 वा. सु. गोंधळवाडी शिवारातील शेतातील रस्त्याजवळ फिर्यादी नामे- शंकर दगडु माने, वय 27 वर्षे, रा. गोंधळवाडी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांना मागील भांडणाची कुरापत काढून नमुद आरोपीतांनी शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने डावे हाताचे दंडावर मारुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी शंकर माने यांनी दि.10.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी :आरोपी नामे-1)शिवाजी भारत जोगदंड, रा. गोरेवाडी ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.10.09.2023 रोजी 11.00 वा. सु. गोरेवाडी येथे फिर्यादी नामे- चंचलाबाई अर्जुन रणदिवे, वय 65 वर्षे, रा. गोरेवाडी ता. जि. उस्मानाबाद नमुद आरोपीने त्यांचे म्हशी सोडल्याने त्या फिर्यादी यांचे नातवंडेचे अंगावर आल्याने फियादी या म्हणाल्या तुझ्या म्हशीला धर त्यावर आरोपी म्हाणाला “ रोड काय तुझ्या बापाचा आहे का” असे म्हणून शिवीगाळ करुन ढाव्या गालावर चापटाने व डावे हाताच्या कोपऱ्यावर काठीने मारहाण केली. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी चंचलाबाई रणदिवे यांनी दि.10.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.