धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल
लोहारा : आरोपी नामे-1)बिलाल हबीब सुंबेकर, 2) अशपाक उर्फ बाबा हबीब सुंबेकर,3) हबीब यासिन सुंबेकर सर्व रा. लोहारा बु ता. लोहारा जि. उस्मानाबाद यांनी जुन्या वादाचे कारणावरुन दि. 31.07.2023 रोजी 10.00 वा. सु. अलिम सुंबेकर यांचे फॅब्रिकेशनच्या दुकानासमोर लोहारा येथे फिर्यादी नामे- शाहीर मुर्तुजा ईनामदार(फकीर), वय 56 वर्षे, रा. लोहारा बु, ता. लोहारा जि. उस्मानाबाद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी बॅट, काठीने शाहीर व त्यांचा भाउ शाहीद मुर्तुजा ईनामदार यांना मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या शाहीर ईनामदार यांनी दि.31.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : आरोपी नामे-1)उषा प्रविण चौधरी, रा. जुनी गल्ली जि. उस्मानाबाद यांनी कौटुंकि वादाचे कारणावरुन दि.31.07.2023 रोजी 11.00 वा. सु. खाजानगर उस्मानाबाद येथे फिर्यादी नामे- आश्विनी दयानंद बनसोडे, वय 25 वर्षे, रा. खाजा नगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लाकडी काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या आश्विनी बनसोडे यांनी दि.31.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : आरोपी नामे-1)शाहु भाउराव देडे, 2) संजय भाउराव देडे, 3) बापू शंकर देडे सर्व रा. राजुरी ता. जि. उस्मानाबाद यांनी प्लॉटचा रस्ता काढून दे या कारणावरुन दि.31.07.2023 रोजी 19.00 वा. सु. फिर्यादीच्या घरासमोर फिर्यादी नामे- राहिबाई लक्ष्मण देडे, वय 60 वर्षे, रा. राजुरी ता. जि. उस्मानाबाद यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या राहिबाई देडे यांनी दि.31.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.