उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

लोहारा  : खेड, ता. लोहारा येथील- झुंबर अनोबा कांबळे, रमाकांत काबंळे, अनिल काबंळे, मंजुळा कांबळे, राजश्री कांबळे यांनी सामाईक भिंतीच्या कारणावरून दि.07.12.2022 रोजी 08.00 वा.सु. गावकरी- नागनाथ रतन सुरवसे यांच्या घरासमोर शिवाजी सुरवसे यास  शिवीगाळ करून काळीने मारहान  करत असताना त्यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या वडीलांना ठार मारण्याच्या उद्देशाने झुबंरव रमाकांत यांनी नागनाथ यांच्या डोक्यात कुह्राडीने व उजव्या हातावर लोखंडी गजाने मारहान करुन त्यांना गंभीर जखमी केले. तसेच यावेळी नागनाथ यांच्या पत्नीस मंजुळा व राजश्री यांसह अनिल यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली.अशा मजकुराच्या नागनाथ सुरवसे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 307, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा दि. 15.02.2023 रोजी नोंदवला आहे.

तुळजापूर  : कौटुंबिक वादाचे कारणावरुन पिंपळा खुर्द, ता. तुळजापूर येथील- गोपाळ तुकाराम रोमन  यांनी दि. 14.02.2023 रोजी 16.00ते 17.00 वा. सु. कात्री शिवारातील फॉरेस्टमध्ये गोपाळ यांची पत्नी दिक्षा रोमन यांना गोपाळने ठार मारण्याच्या उद्देशाने गळ्यावर कटरने वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या तुळजापूर पो.ठा.चे सपोनि- ज्ञानेश्वर शकंरराव कांबळे यांनी दि.15.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : तेर, ता. उस्मानाबाद येथील- सिंधु लोबाजी बगाडे, वय 38 वर्षे व त्यांचे पती लोबाजी बगाडे हे दि. 02.02.2023 रोजी रात्री 10.00 वा. दरम्यान त्यांचे घरी होते. यावेळी गावकरी- सुहास रतन नाईकवाडी, गुड्डू रतन नाईकवाडी, गणेश नाईकवाडी, बंडू कांबळे या चौघांनी तेथे जाउन संगणमत करुन जुन्यावादाच्या कारणावरुन लोबाजी यांच्या घरात घुसून शिवीगाळ करुन त्यांच्या हातावर चाकूने वार गंभीर जखमी केले. लोबाजी यांच्या बचावासाठी पत्नी सिंधु यांनी धाव घेतली असता त्यांसही नमूद चौघांनी काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सिंधु बगाडे यांनी दि.15.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326,452,323,504,506, 34 सह अ.जा.ज.अ.प्र.कायदा कलम- 3(1)(3)(10) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web