धाराशिव जिल्ह्यात हाणामारीची तीन गुन्हे दाखल 

 
crime

लोहारा  : होळी, ता. लोहारा येथील- योगेश कदम, मोहन कदम या दोघांनी दि.23.06.2023 रोजी 10.00 ते 17.30 वा.सु. कौटुंबिक वादाचे कारणावरुन नारंगवाडी व होळी शिवार येथे जिवे मारण्याचे उद्देशाने गावकरी- मोहन पांडुरंग जाधव  यांचा मुलगा रणजित जाधव यांना शिवीगाळ करुन लाथाबुंक्यानी, मारहाण करुन  हाताने गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या मोहन जाधव यांनी दि.25.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-307, 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : खेर्डा, ता. कळंब येथील- सत्यशील काकडे, तानाजी काकडे, गणेश लोकरे, ज्ञानेश्वर लोकरे, रविंद्र लोकरे, प्रमोद लोकरे, उमेश लोकरे या सर्वांनी दि.24.06.2023 रोजी 08.00 वा.सु. खेर्डा गावातील हनुमान मंदीरासमोर खेर्डा येथे जिवे मारण्याचे उद्देशाने गावकरी- पोलीस पाटील- अजित बापुराव जाधव यांना शिवीगाळ करुन लाथाबुंक्यानी, मारहाण करुन हाताने गळा दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या अजित जाधव यांनी दि.25.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-353, 307, 324, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : पिंपळगाव को, ता. वाशी येथील- अर्जुन वालचंद मुंडे यांनी दि.21.06.2023 रोजी 22.30  रोजी काही एक कारण नसताना पिंपळगाव शिवार येथे गावकरी- प्रकाश वालचंद मुंडे  यांना शिवीगाळ करुन लाथाबुंक्यानी, मारहाण करुन  लोखंडी सतुरने प्रकाश यांचे डावे डोळ्यावर मारुन गंभीर जखमी केले. प्रकाश यांची पत्नी त्यांचे बचावास आले असता त्यासही शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या प्रकाश मुंडे यांनी दि.25.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-326, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web