धाराशिव जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 

 
crime

 लोहारा  : धानुरी ता.लोहारा येथील- 1.बाळासाहेब प्रकाश बाबर 2. तुषार श्रीधर जावळे 3. राहुल शिवाजी बाबर या सर्वांनी  ट्रॅव्हल्स चे गाडी मालक विशाल कट्टे यास फोनवर पॅसेंजर ची बुकींग तुम्ही त्याला का दिलास असे का विचारलास या कारणावरुन दि.20.05.2023 रोजी 22.30 वा. दरम्यान धानुरी येथील गावकरी - नारायण अशोक साळुंके  यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी,लोखंडी रॉडने, मारहान करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नारायण साळुंके यांनी दि.21.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324,323,452,504,506,34  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब  : मोहा ता.कळंब येथील- 1.बाताहेर सलीम शेख 2. सलीम बागवान या दोघांनी  मोहा येथील जागा/ घर व ट्रॅक्टरच्या दोन ट्रॉल्या मला विकायच्या आहेत या कारणावरुन दि.21.05.2023 रोजी 22.30 वा. दरम्यान मौजे मोहा ता.कळंब येथील गावकरी - सयदु सलीम शेख यांना शिवीगाळ करुन काठीने  मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या सयदु शेख यांनी दि.21.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324,323, 504,34  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा  : चोराखळी ता.कळंब येथील- बालाजी भउ काळे यांनी तुम्ही माझी बायको व पोरे यांना तुमच्या घरी का लपवुन ठेवतात या कारणावरुन दि.18.05.2023 रोजी 21.30 वा. दरम्यान मौजे चोराखळी ता.कळंब येथील गावकरी - पुजा महादेव काळे यांना शिवीगाळ करुन, जिवे मारण्याच्या उद्देशाने महादेव काळे यांचे डोकीत काठी मारुन, पुजा काळे यांस चावा घेतला व मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या पुजा काळे यांनी दि.21.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307,324,506  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web