उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

तुळजापूर  : जवळगा (मे.), ता. तुळजापूर येथील धनाजी सुभाष मोहिते हे दि. 10.12.2021 रोजी 16.00 वा. सु. गावकवरी- किशोर राजेंद्र मोरे यांच्या हॉटेलमध्ये गेले असता किशोर यांनी धनाजी यांना हॉटेलात मद्य पिण्यास मनाई केली. यावर चिडून जाउन धनाजी यांनी किशोर यांना शिवीगाळ करुन किशोर यांच्या उजव्या हातावर कत्तीने वार मारुन जखमी केले. अशा मजकुराच्या किशोर मोरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
नळदुर्ग : आरबळी, ता. तुळजापूर येथील रसुल बाबु नदाफ यांसह त्यांच्या कुटूंबातील 3 व्यक्ती यांचा गावातीलच- असिफ अफसर नदाफ यांसह त्यांच्या कुटूंबातील 3 व्यक्तींशी जुन्या वदावरुन दि. 11.12.2021 रोजी 20.00 वा. सु. हानामाऱ्या झाल्या. यात दोन्ही कुटूंबातील स्त्री- पुरुषांनी परस्परविरोधी कुटूंबातील सदस्यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली व लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या रसुल नदाफ व असिफ नदाफ यांनी दि. 12 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत परस्परविरोधी 2 गुन्हे नोंदवले आहेत.

उस्मानाबाद : विजयनगर, उस्मानाबाद येथील रामेश्वर हणुमंत कांबळे यांनी भुखंडाच्या जुना वाद उकरुन काढून दि. 11.12.2021 रोजी 20.00 वा. सु. भाऊ- उत्रेश्वर हणुमंत कांबळे यांना त्यांच्या घरासमोर लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या उत्रेश्वर कांबळे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल

येरमाळा  : येरमाळा येथील संजय आबा बारसकर यांनी दि. 12.12.2021 रोजी 12.30 वा. सु. गावातील त्यांच्या वडापाव सेंटरमध्ये स्वत:च्या व इतरांच्या जिवीतास धोका होईल अशा स्थितीत उकळत्या तेलाची कडई बाळगून भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले तर सुहास शंकर चव्हाण यांनी गावतील बस थांब्यासमोरील रस्त्यावर ऑटोरिक्षा क्र. एम.एच. 25 एम 151 हा रहदारीस धोकादायपने उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले.

यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web