उस्मानाबाद जिल्ह्यात हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

कळंब :  शिवाजीनगर, कळंब येथील तुषार व मंजुषा तावरे यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन दि. 26.11.2021 रोजी 06.30 वा. सु. ग्रामस्थ- दिलीप सोनाजी लावंड यांना त्यांच्या घरासमोर लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दिलीप लावंड यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : उमरगा येथील दत्ता जाधव जुन्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरुन दि. 26.11.2021 रोजी 09.00 वा. सु. उमरगा येथे ग्रामस्थ- दिगंबर बनसोडे यांना शिवीगाळ करुन चपराक मारल्याने दिगंबर हे जवळील टपरीच्या अँगलला धडकल्याने त्यांच्या डोक्यास मार लागून ते जखमी झाले. अशा मजकुराच्या दिगंबर बनसोडे यांल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : ढेकरी, ता. तुळजापूर येथील सिध्देश्वर हनमंत काळे यांसह त्यांची पत्नी- नागीनी यांचा भाऊ- ज्ञानेश्वर हनमंत काळे यांसह त्यांची पत्नी- वैशाली व नेशन शिंदे, रा. पिंपळा (धा.) यांच्याशी शेवग्याच्या शेंगा तोडणीच्या कारणावरुन दि. 25.11.2021 रोजी 18.00 ते 19.00 वा. दरम्यान वाद झाला. याचे पर्यावसान हानामारीत होउन नमूद दोन्ही कुटूंबीयांनी परस्परविरोधी कुटूंबातील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाड, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या नागीनी काळे व ज्ञानेश्वर काळे यांनी दि. 26 नोव्हेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत परस्परविरोधी 2 गुन्हे तुळजापूर पो.ठा. येथे नोंदवले आहेत.

                                                                                                           

From around the web