घरफोड्या व चोरी करणारे तीन आरोपी जेरबंद 

२३ तोळे सोने, १ दुचाकी मोटरसायकल, १ मोबाईल हस्तगत 
 
sd
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची कामगिरी 

 धाराशिव  - धाराशिव शहर आणि जिल्ह्यात घरफोड्या व चोरी करणाऱ्या तीन आरोपीना  जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.  या चोरट्याकडून पोलिसांनी  २३ तोळे सोने, १ दुचाकी मोटरसायकल, १ मोबाईल असा एकुण साडेनऊ लाखाचा  मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 दि. 16.07.2023 रोजी उस्मानाबाद उपविभागात मालाविषयी गुन्हे उघडकीस करणेकामी स्थानिक गुन्हे शाखेच पथक हे पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, उस्मानाबाद जिल्ह्यातील बऱ्याच पोलीस स्टेशनचे हद्दीत घरफोडी करणारा पाहिजे, निष्पन्न आरोपी नामे कृष्णा श्रावण शिंदे रा.सुंभा ता.जि. उस्मानाबाद हा सध्या येडशीयेथे उड्डाण पुलाखाली थांबला आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने स्थागुशाचे पथक मिळाले बातमीच्या ठिकाणी गेलो असता मिळालेल्या बातमी प्रमाणे वर्णनाचा एक ईसम मोटारसायकल व एक मोबाईल मिळून आला त्यास त्याचे नाव गाव बाबत विचारपूस केली असता त्यने त्याचे नाव कृष्णा श्रावण शिंदे, वय 25 वर्षे, रा सुंभा ता.जि. उस्मानाबाद असे सांगितले. 

तो मालाविषयी गुन्हे करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने त्यास ताब्यात घेवून स्थानिक गुन्हे शाख उस्मानाबाद येथे घ्ज्ञेवून येवून त्यास विश्वासात घेवून चौकशी केली असता त्याने, त्याचा साथीदार भाउ अजय श्रावण शिंदे, चुलत भाउ विकी सजगिऱ्या शिंदे रा.सुंभा असे तिघांनी मिळून मागील कालावधीत शिराढोण, बेंबळी, व ढोकी पोलीसस्टेशन हद्दीतील मौजे बोरगाव खु, वडगाव, हिंगणगाव, दाभा, जायफळ, देवळाली, चिखली, बोरगाव राजे, गौडगाव, लासोना, वाखरवाडी, इर्ला, दाउतपूर, तावरजखेडा, कोंड, आरणी, तुगाव, म्होतरवाडी,पळसप, रांजणी, उस्मानाबाद शहरात व घाटंग्री या गावात घरफोड्या चोऱ्या केल्या आहेत असे सांगीतले. त्याप्रमाणे खात्री केली असता त्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील 24 घरफोड्या, सोलापूर जिल्ह्यातील 02 चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचे कडून विविध गुन्ह्यातील गेले मालापॅकी 23 तोळे सोने, 01 दुचाकी मोटरसायकल, 01 मोबाईल असा एकुण 9,44,617/- ₹ किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.सदर आरोपी हा उस्मानाबाद जिल्ह्यातील 10, लातुर जिल्ह्यात 03 सोलापूर जिल्ह्यात 02 असे एकुण 15 गुन्हात पाहिजे आरोपी आहे.

      सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक  नवनीत कॉवत यांचे आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली स्थागुशा चे पोलीस निरीक्षक  यशवंत जाधव, सहा पोलीस निरीक्षक  मनोज निलंगेकर, पोलीस उपनिरीक्षक संदीप ओहोळ, व पोलीस अंमलदार वलऊल्ला काझी, शौकत पठाण, विनोद जानराव, फरहाण पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, शैला टेळे, नितीन जाधवर, बबन जाधवर, साईनाथ अशमोड, पांडुर्रग सावंत, योगेश कोळी, सुनिल मोरे, योगेश कदम, पांडुरंग म्हस्के, मुजीफ पठाण, गणेश कुंभार, रत्नदिप डोंगरे यांनी केली आहे.

From around the web