घारगावच्या तीन आरोपींना कारावासासह आर्थिक दंडाची शिक्षा

 
court

शिराढोण  : घारगाव, ता. कळंब येथील 1) साहेबराव नारायण गुंडीबने 2)श्रीराम साहेबराव गुंडीबने 3)जयराम मुरलीधर भुत्तापल्ले या तीघांनी आम्हत्येस करण्यास प्रवृत्त करुन शिवीगाळ, मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिल्याने त्यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 306, 323, 504, 506, 34 अंतर्गत शिराढोन पोलीस ठाण्यात नोंद क्र. 217 / 2017 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक श्री. संजीवन व्ही. मिरकले यांनी करुन अतिरिक्त सत्र न्यायदंडाधिकारी क्र.1 यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या सत्र खटला क्र. 26 / 2018 चा निकाल काल दि. 08.12.2021 रोजी जाहिर झाला. यात नमूद तीघा आरोपींस भा.दं.सं. कलम- 323, 34 या कलमांच्या उल्लंघनाबद्दल प्रत्येकी एक महिना साधा कारावासासह प्रत्येकी 1,000 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

मारहाण 

भूम : भुम येथील गोलाई चौकात दि. 08 डिसेंबर रोजी 11.20 वा. दोन मोटारसायकलची धडक झाली. यात वाद उद्भवून भुम ग्रामस्थ- अरुण, संदीप, धनाजी गाढवे यांनी गावकरी- विकी जावळे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी देउन लाथाबुक्क्यांनी मारहान केल्याने जावळे यांचा दात निखळला. अशा मजकुराच्या जावळे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 504, 506, 34 व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web