तुळजापुरात चोरीच्या नऊ  मोटारसायकलसह तीन आरोपी अटकेत

 
s

तुळजापूर  : होंडा शाईन मोटारसायकल चोरी संबंधी तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.दं.सं. कलम- 379 नुसार दाखल गुन्हा नोंद क्र. 425 / 2021 चा तपास पोलीस उप अधीक्षक श्रीमती सई भोरे-पाटील, पोनि- अजिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ- सोनवने, पोना- महादेव सुडके, पोकॉ- सावरे यांचे पथक तपास करत होते. यातून प्राप्त माहिती आधारे पथकाने आज दि. 07.12.2021 रोजी 1)उध्दव जाधव, 2)दिपक वाघ, दोघे रा. रेणापूर, जि. लातूर 3)नारायण सिरसाट रा. अंबाजोगाई, जि. बीड या तीघांना अटक केली असून उपरोक्त गुन्ह्यातील मोटारसायकलसह एकुण चोरीच्या गुन्ह्यांतील 9 मोटारसायकल त्यांच्या ताब्यातून जप्त केल्या आहेत. यात होंडा शाईन- 3, एचएफ डिलक्स- 3, पॅशन प्रो- 2, स्प्लेंडर- 1 अशा मोटारसायकलचा समावेश असून त्यांच्या सांगाडा व इंजीन क्रमांकाच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.

 चोरीच्या स्मार्टफोनसह एक आरोपी अटकेत

उस्मानाबाद  : स्मार्टफोन चोरी संबंधी आनंदनगर पोलीस ठाणे येथे भा.दं.सं. कलम- 379 नुसार गुन्हा नोंद क्र. 334 / 2021 हा दाखल आहे. तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या सपोनि- मनोज निलंगेकर यांच्या पथकाने सायबर पोलीस ठाण्याच्या मदतीने तो स्मार्टफोन शोधण्याचा प्रयत्न केला. यावर तो स्मार्टफोन मुळचा उत्तर प्रदेशात राहणारा परंतु सध्या समर्थनगर, उस्मानाबाद येथे वास्तव्यास असलेला- सुनिलकुमार ज्ञानप्रसाद चौधरी याच्या जवळ असल्याचे स्पष्ट होताच पथकाने आज दि. 07.12.2021 रोजी चोरीच्या स्मार्टफोनसह ताब्यात घेतले आहे.

From around the web