चिरेवाडीत शेतीच्या कारणावरून बेदम मारहाण 

 
crime

उमरगा  : आरोपी नामे-1)विष्णू महादेव वाघमोडे, 2) राम महादेव वाघमोडे, 3)शितलबाई विष्णू वाघमोडे, सर्व रा. चिरेवाडी, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांनी दि. 02.08.2023 रोजी 18.00 वा. सु. फिर्यादीचे वडीलांचे घरी चिरेवाडी येथे  असताना फिर्यादी नामे-कविता गोविंद शेंडगे, वय 40 वर्षे, रा. कोरेगाववाडी, ता. उमरगा जि. उस्मानाबाद हा.मु. चिरेवाडी, ता. उमरगा जि. उस्मानाबाद हे त्यांचे माहेरी वडीलांचे घरासमोर जेवन करण्यासाठी बसलेली असताना नमुद आरोपीने फिर्यादीच्या वडीलांना शेतातील रवलेली हद्दीचे दगड का काढले असे आम्हाला का विचारले याचे कारण काढून फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यानी, कठीने दगडाने डोक्यात मारुन जखमी केले. तसेच जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या कविता शेंडगे यांनी दि.03.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

  रस्ता अपघात

वाशी  :जखमी नामे-सुधाकर किसन मोरे, वय 60 वर्षे रा. सारोळा तांडवा, ता. वाशी जि. उस्मानाबाद हे दि.25.12.2022 रोजी 11.00 वा. सु. वाशी फाटा येथुन मोटरसायकल क्र एमएच 25 ए ई 2467 वरुन जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून सुधाकर मोरे यांचे मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या आपघातात  सुधाकर मोरे हे गंभीर जखमी होवून उजव्या पायाचे हाड फॅक्चर करुन त्यांना दवाखान्यात न नेता निघून गेला आहे. अशा मजकुराच्या सुधाकर मोरे यांनी दि.03.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, मो.वा. का. कलम 134 अ ब  अन्वये गुन्हा नोंदवला आहे.                                      

From around the web