तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे दागिने लंपास करणारा चोरटा जेरबंद 

 
crime

तुळजापुर  : महाराष्ट्राची कुलस्वामींनी आई तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी  तुळजापुरात आलेल्या भाविकांचे दागिने लंपास करणाऱ्या एका  चोरट्यास पोलिसांनी मंदिर परिसरात अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. 


दि.27.06.2023 रोजी 11.00 वा. सुमारास फिर्यादी- निंगन्ना भिमसिंग राठोड, वय 25 वर्ष रा. कोळीहाल तांडा, ता. हुनस्की, जि. यादगीर, राज्य कर्नाटक या त्यांचे कुटुंबासह  तुळजापुर येथील श्री. तुळजाभवानी मंदीर येथे दर्शनास आल्या होत्या. दरम्यान चप्पल स्टॅन्ड समोर तुळजापूर येथे  अज्ञात व्यक्तीने निंगन्ना यांचे लहान मुलाचे गळ्यातील 6 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन एकुण 30,000 ₹ किंमतीची लुटून पसार झाला होता. अशा मजकुराची  निंगन्ना राठोड यांनी दि.27.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पोलीस ठाणे गुरन 261/2023 भा.दं.सं. कलम- 392 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

गुन्हाच्या तपासादरम्यान तुळजापूर पोठाचे पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बेकराई नगर, हडपसर, ता. पुणे येथील- तानाजी  रामा जाधव यास गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही तासांत श्री तुळजाभवानी मंदीरासमोर परिसरातील चप्पल स्टॅन्ड  तुळजापूर येथुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने प्रथमत: पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास अधिक विश्वासात घेउन विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलीसांनी त्याच्या ताब्यातून गुन्ह्यातील गेला माला 6 ग्रॅम वजनाची  सोन्याची चैन असा माल हस्तगत करुन पुढील कार्यवाहिस्तव त्यास चोरीच्या मालासह ताब्यात घेवून सदर गुन्ह्याच्या तपास कामी अटक केली असुन पोलीस सदर गुन्ह्याचा तपास पोलीस करत आहे.

            सदरची  कामगीरी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी , अपर पोलीस अधीक्षक  नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली  तुळजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक-  ज्ञानेश्वर कांबळे,  चास्कर, पोलीस हावलदार- लोखंडे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर माळी यांचे पथकाने केली आहे.

आणखी एक गुन्हा दाखल 

तुळजापुर  :पालम,ता. परभणी येथील- दत्तराव रावसाहेब कदम, वय 42 वर्ष हे दि.27.06.2023 रोजी 18.15 वा.दरम्यान तुळजापुर येथील श्री तुळजाभवानी मंदीर दर्शनास गेले  होते दरम्याण मंदीर संस्थानच्या ऑफीस समोर तुळजापूर येथुन दत्तराव यांचे ईजारीच्या खिशातील रोक रक्कम अंदाजे 42,500 ₹ ही गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या दत्तराव कदम यांनी दि.27.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web