तुळजापूरच्या नवरात्रोत्सवास चोरट्यांची हातसफाई 

तीन स्मार्टफोनसह एक आरोपी अटकेत
 
s

उस्मानाबाद  :  तुळजापूरच्या नवरात्रोत्सवास चोरट्यांची हातसफाई सुरु आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तीन स्मार्टफोनसह एका  आरोपीस  अटक केली आहे. 

तुळजापूर येथील नवरात्रोत्सव गर्दीत दि. 13 ऑक्टोबर रोजी तेलंगण राज्यातील विरशेट्टी भन्नूर, कसना डेंडी, मुनय्या मटा अशा तीघांचे तीन स्मार्टफोन चोरीस गेल्याने तुळजापूर पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 379 नुसार 354 / 2021 हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. 

तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोउपनि-  माने यांच्या पथकाने रफीक रशीद, रा. बीड शहर यास लागलीच तुळजापूर येथून ताब्यात घेतले. यावेळी नमूद तीन्ही स्मार्टफोन त्याच्या ताब्यात आढळल्याने त्यास तुळजापूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरीत तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.

पोलीस रात्रगस्ती दरम्यान संशयीत ताब्यात

तुळजापूर  : तुळजापूर पो.ठा. चे पथक दि. 13 ऑक्टोबर रोजी 01.40 वा. सु. तुळजापूर शहरात रात्रगस्तीस असतांना शहरातील सुनिल प्लाझा येथील तळमजल्यातील अंधारात गणेश नंदु भोसले, रा. लोहगाव (बी.), ता. पैठण, जि. औरंगाबाद हा संशयास्पदरित्या थांबलेला आढळला. अवेळी तेथे उपस्थित असण्याच्या कारणांबाबत पथकाने त्यास विचारले असता तो असंबध्द माहिती देत असल्याने पोलीसांनी त्यास ताब्यात घेउन त्याच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम- 122 अंतर्गत तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

 पोलीस ठाणे आवारात गोंधळ करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल

बेंबळी : रविंद्र भास्कर पाटील, रा. अनसुर्डा, ता. उस्मानाबाद यांनी दि. 13 ऑक्टोबर रोजी 16.00 वा. सु. बेंबळी पोलीस ठाणे आवारात मद्यधुंद अवस्थेत आरडा- ओरड करुन सार्वजनिक शांततेचा भंग करुन म.दा.का. कलम- 65 (ई) चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन गुन्हा नोंदवला आहे.

From around the web