तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात चोरट्यांचा शिरकाव 

दर्शनासाठी आलेल्या बीड जिल्ह्यातील भक्ताच्या गळ्यातील सोन्याची साखळी लंपास 
 
Osmanabad police

तुळजापूर  : तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात चोरट्यांचा शिरकाव झाला आहे. दर्शनासाठी आलेल्या बीड जिल्ह्यातील एका भक्ताच्या  गळ्यातील सोन्याची साखळी चोरट्याने लंपास केली आहे. 

सतिश पांडुरंग सेडोळकर, रा. धारुर, जि. बीड हे दि. 10 ऑक्टोबर रोजी तुळजाभवानी मंदीरात असतांना अज्ञाताने गर्दीचा फायदा घेउन त्यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाची सुवर्ण साखळी चोरुन नेली.या प्रकरणी त्यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. 

            दुसऱ्या घटनेत सुरेश काशीनाथ बडगुजर, रा. जळगांव हे दि. 10 ऑक्टोबर रोजी 22.30 वा. सु. तुळजापूर येथील जुने बसस्थानकात असतांना अज्ञाताने गर्दीचा फायदा घेउन त्यांच्या विजारीच्या खिशातील स्मार्टफोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या सतिश सेडोळकर व सुरेश बडगुजर यांनी दि. 11 ऑक्टोबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

 उस्मानाबादेत हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल पळविली 

उस्मानाबाद  : रोहित दिपक धुत, रा. रामदेवनगर, उस्मानाबाद यांनी त्यांच्या घरासमोर लावलेली त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 5499 ही दि. 08 ऑक्टोर रोजी 01.30 ते 08.00 वा. दरम्यान अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या रोहित धुत यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web