वाशीत दोन ठिकाणी चोरीच्या घटना 

 
crime

वाशी :फिर्यादी नामे- बाबुराव सोपानराव कावळे, वय 65 वर्षे, रा. चांदवड, ता.भुम जि. उस्मानाबाद यांचे शेतातील राहते घराचे गेटचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.17.08.2023 रोजी 23.00 ते 18.08.2023 रोजी 03.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील 2 तोळे 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, व चांदीचे चैन, ग्लास, करंडा, इतर वस्तु व रोख रक्कम 30,000₹ असा एकुण  1,97,500 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या बाबुराव कावळे यांनी दि.18.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 457, 380, 511 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

वाशी  : आंद्रुड येथील लिमकर वस्तीवरील सरकारी विहीरीवरील मोकळ्या जागेतील एचडीपी पाईपलाईनचा रिटर्न ऑल, स्टार्टर, केबल वायर असा एकुण 4,300₹ किंमतीचे साहित्य हे दि.16.08.2023 रोजी 10.00 ते दि.17.08.2023 रोजी 13.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या ग्रामपंचायत शिपाई- देविदास भिमराव गिते रा. आंद्रुड, ता. भुम जि. उस्मानाबाद यांनी दि.18.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी  पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  :फिर्यादी नामे- देविदास दिगंबर बन्ने, वय 42 वर्षे, रा. घर नं 125 उत्तर कसबा पत्रा तालीम सोलापूर हे दि.17.08.2023 रोजी 13.00 वा. सु.  उस्मानाबाद स्थानक येथुन तुळजापूर कडे रिक्षाने जात असताना रिक्षातील अज्ञात दोन व्यक्तीनी देविदास बन्ने यांचे शर्टच्या वरच्या खिशातील व्हीवो कंपनीचा मोबाईल व रोख रक्कम 3,500 असा एकुण 8,500 ₹ किंमतीचा माल लुटून पसार झाले.अशा मजकुराच्या देविदास बन्ने यांनी दि.18.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 392,34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे

From around the web