उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरीच्या घटना 

 
Osmanabad police

कळंब : कळंब येथील नामदेव रामकृष्ण शिंदे हे दि. 11.11.2021 रोजी 19.45 वा. सु. कन्हेरवाडी फाटा येथील रस्त्याने रस्त्याने मोटारसायकल चालवत जात होते. दरम्यान त्यांना फोन आल्याने त्यांनी रस्त्याबाजूस मोटारसायकल थांबवली असता चार अनोळखी पुरुषांनी नामदेव शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन त्यांच्या बोटातील 12 ग्रॅम वजनाची सुवर्ण अंगठी व खिशातील 13,000 ₹ रक्कम लुटून नेली. अशा मजकुराच्या नामदेव शिंदे यांनी दि. 12.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

येरमाळा : उस्मानाबाद येथील श्रीमती वर्षा गणेश आचार्य या दि. 04.11.2021 रोजी 15.00 ते 17.00 वा. दरम्यान तेरखेडा ते येरमाळा असा एसटी बसने प्रवास करत होत्या. दरम्यान अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेउन वर्षा यांच्या नकळत त्यांची पिशवी उघडून आतील 30 ग्रॅम वजनाचे सुवर्ण हार चोरुन नेला. अशा मजकुराच्या वर्षा आचार्य यांनी दि. 12.11.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : काटगाव, ता. तुळजापूर येथील विठ्ठल सु    भाष हुकीरे यांच्या शेत गट क्र. 342 मधील शेत गोठ्यातील दावणीला बांधलेल्या 22 जनावरांपैकी एक मुऱ्हा म्हैस दि. 10- 11.11.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या हुकीरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरी करतांना चोर अटकेत

कळंब -  कळंब येथील रामप्रसाद व सुजीत अशोक बिस्वास (मुळ रा. ओडीशा राज्य) हे दोघे भाऊ दि. 11.11.2021 रोजी 21.00 वा. सु. येरमाळा रस्त्यालगतच्या फाटक तेल गिरणीतील 1.8 मीटर लोखंडी साखळीसह इतर 50 कि.ग्रॅ. लोखंडी साखळ्या व 20 कि.ग्रॅ. लोखंडी नळी असे साहित्य चोरुन नेत असल्याचे गिरणी व्यवस्थापक- दत्तात्रय शिंदे यांना आढळले. यावर त्‍यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने त्या दोघांना कळंब पोलीसांच्या ताब्यात दिले. यावरुन कळंब पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web