उस्मानाबाद, मुरूम, अणदूर आदी चार ठिकाणी चोरीची घटना 

 
Osmanabad police

उस्मानाबाद  : जयहिंद दिलीप रसाळ, रा. उस्मानाबाद यांनी त्यांची मोटारसायकल क्र. एम.एच. 45 झेड 8362 ही दि. 10- 12 सप्टेंबर दरम्यान उस्मानाबाद येथील ‘राज वाईनशॉप’ समोर लावली असता ती अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या जयहिंद रसाळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : बाळासाहेब तेरकर, रा. गावसुद, ता. उस्मानाबाद यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 11- 12 सप्टेंबर रोजीच्या रात्री तोडून घरातील 44 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, 150 ग्रॅम वजनाचे चांदीच्या वस्तू व 50,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या बाळासाहेब तेरकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मुरुम  : मुस्तफा कोतवाल, रा. मुरुम, ता. उमरगा हे दि. 12 सप्टेंबर रोजी 15.00 वा. सु. मुरुम येथील टपाल कार्यालयासमोरील रस्त्याने पायी जात होते. दरम्यान गर्दीचा फायदा घेउन अज्ञाताने कोतवाल यांच्या विजारीच्या खिशातील स्मार्टफोन चोरुन नेला. अशा मजकुराच्या कोतवाल यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

नळदुर्ग  : श्रीमती सिमा काकडे, अणदूर, ता. तुळजापूर या दि. 09 सप्टेंर रोजी 08.00 ते 20.00 वा. दरम्यान बाहेर गावी गेल्या असता त्यांच्या खोलीच्या उघड्या खिडकीजवळ आतून ठेवलेला डेल कंपनीचा लॅपटॉप अज्ञाताने चोरुन नेला. अशा मजकुराच्या सिमा काकडे यांनी दि. 12 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web