उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना 

 
Osmanabad police

उस्मानाबाद -  नामदेव शंकर माळी, रा. जुना उपळा रोड, भानुनगर, उस्मानाबाद हे दि. 13.12.2021 रोजी 02.30 वा.सु. आपल्या घरात कुटूंबीयांसह झोपले असतांना 20 ते 35 वयोगटातील पाच अनोळखी पुरुषांनी त्यांच्या घराचा कडी- कोयंडा तोडून आत प्रवेश करुन नामदेव यांसह त्यांच्या पत्नीस काठीने मारहान केली व चाकुचा धाक दाखवून पत्नीच्या गळष्यातील सुवर्ण मंगळसुत्र व कानातील झुमके असे अंदाजे 82,000 ₹ किंमतीचे दागिने जबरीने चोरुन नेले.

दुसऱ्या घटनेत शेजारीलच गल्लीत राहनारे महादेव सिकंदर पवार हे दि. 13.12.2021 रोजी 01.30 वा. सु. घरात झोपलेले असतांना त्यांच्या घराची आतील कडी अज्ञात व्यक्तीने उचकटून घरात प्रवेश करुन महादेव पवार यांना मारहान करुन घरातील सुवर्ण दागिने व स्मार्टफोन असा 2,32,600 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला.

अशा मजकुराच्या नामदेव माळी यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 395, 397 अंतर्गत गुन्हा नोंदवला. तर महादेव पवार यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा : कोंडजीगड येथील सुरजाबाई अर्जुन होनराव यांच्या शेतातील कुकूटपालन शेडचे कुलूप दि. 12- 13.12.2021 रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने तोडून शेडमधील 15 क्विंटल सोयाबीन, 30 रिकामे पोते व 1 अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप चोरुन नेला. अशा मजकुराच्या सुरजाबाई होनराव यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा: वरुड, ता. भुम येथील सुरेश सदाशिव चोरमले यांच्या कौडगाव गट क्र. 73 मधील शेतातील 13,331 कि.ग्रॅम. वजनाचा ऊस कौडगाव ग्रामस्थ- रामा देविदास कोळेकर व सुजाता रामा कोळेकर या दोघांनी चोरमले यांच्या संमती शिवाय दि. 24.11.2021 ते 09.12.2021 रोजी दरम्यान तोडून साखर कारखान्यास घातला. अशा मजकुराच्या सुरेश चोरमले यांनी दि. 13 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


लैंगीक छळ

उस्मानाबाद  : उस्मानाबाद तालुक्यातील एका 25 वर्षीय तरुणाने एका 29 वर्षीय महिलेशी (नाव- गाव गोपनीय) जवळीक साधुन सन- 2015 पासून तीच्याशी शरिरसंबंध ठेवले. दरम्यानच्या काळात त्या तरुणाने तीच्या सोबतचे छायाचित्रन करुन ते इतरांना दाखवून तीची बदनामी करण्याची धमकी देउन वेळोवेळी तीच्यावर लैंगीक अत्याचार केल्याने यात ती महिला गर्भवती झाली. अशा मजकुराच्या पिडीत महिलेने 13.12.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 376 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपहरण 

उस्मानाबाद  : उस्मानाबाद तालुक्यातील एका 17 वर्षीय मुलगीस (नाव- गाव गोपनीय) दि. 09.12.2021 रोजी 06.30 वा. सु. तीच्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने तीचे अपहरण केले. अशा मजकुराच्या मुलीच्या आईने दि. 13 डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 363 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web