चिखली, दुधगाव येथे चोरीची घटना 

 
Osmanabad police

बेंबळी  : संपत नारायण काकडे, रा. चिखली, ता. उस्मानाबाद हे दि. 08 सप्टेंबर रोजी 12.30 ते 15.30 वा. दरम्यान चिखली शेत शिवारातील एका झाडाखाली झोपले होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या सदऱ्याच्या खिशातील स्मार्टफोन अज्ञाताने चोरुन नेला. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : गणेश पुरी, रा. दुधगाव, ता. उस्मानाबाद हे दि. 10 सप्टेंबर रोजी 09.00 वा. सु. गावातील आपल्या किराणा दुकानात होते. यावेळी एका मोटारसायकलवर आलेल्या तीन अनोळखी परुषांनी दुकानात खरेदी करण्याचा बहाना करुन गणेश यांची नजर चुकावून दुकानाच्या गल्ल्यातील स्मार्टफोन व 3,600 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web