उमरग्यात एकाच तीन ठिकाणी चोरी 

शिरढोण, उस्मानाबाद, तुळजापूर येथेची चोरीची घटना 
 
Osmanabad police

उमरगा  : प्रकाश सिद्रणप्पा दळगडे, रा. उमरगा यांच्या उमरगा गट क्र. 267 मधील शेत घराचा कडी- कोयंडा दि. 19- 20 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री तोडून आतील 14 पोती उडीद व 1 पोते ज्वारी चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रकाश दळगडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत श्रीधर पवार, रा. नाईचाकुर, ता. उमरगा यांनी त्यांची हिरो होंडा मो.सा. क्र. एम.एच. 25 के 1110 ही दि. 17 सप्टेंबर रोजी 13.00 ते 14.00 वा. दरम्यान त्यांच्या शेताशेजारील रस्त्याकडेला लावली असता ती अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या श्रीधर पवार यांनी दि. 20 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            तिसऱ्या घटनेत फेरोज शेख, रा. हमीदनगर, उमरगा यांनी त्यांच्या राहत्या घरासमोर ठेवलेला त्यांचा मिनीट्रक क्र. एम.एच. 12 एफझेड 7915 मधील पावडरचे 25 कि.ग्रॉ. चे 2 पिंपे दि. 20 सप्टेंबर रोजी 01.00 ते 02.00 वा. दरम्यान अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फेरोज शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

शिराढोण  : मंगरुळ, ता. कळंब येथील बाबुराव दिगंबर कानडे, बापू विठ्ठल साळुंके व शेख नैमुद्दीन खैमुद्दीन या तीघांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञाताने दि. 19- 20 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री तोडून कानडे यांच्या घरातील 10,14,120 ₹ किंमतीच्या 160 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिन्यांसह रोख रक्कम व साळुंके यांच्या घरातील 29 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने आणि शेख यांच्या घरातील 8,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या बाबुराव कानडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : सलीम शेख, रा. जुनोनी यांच्या शेत गट क्र. 66 मधील शेडमधील 2 शेळ्या, 1 कोकरु व 1 बोकड दि. 15- 16 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या सलीम शेख यांनी दि. 20 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर  : आकाश पठाडे, रा. ढेकरी, ता. तुळजापूर यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील भिंतीला अज्ञात व्यक्तीने दि. 20 सप्टेंबर रोजी 11.30 ते 13.00 वा. दरम्यान छिद्र पाडून घरातील 54 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, 80 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व 15,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या आकाश पठाडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 454, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web