तुळजापूर तालुक्यात दोन ठिकाणी चोरी 

 
crime

तुळजापूर  : फिर्यादी नामे- अजय बंडु जोगडे, वय 32 वर्षे, रा. हंगरगा रोड प्रतिक्षा नगर, तुळजापूर ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांची 30,000₹ किंमतीची होन्डा ड्रिम युगा मोटरसायकल ही दि.26.07.2023 रोजी 21.00 ते दि.27.06.2023 रोजी 06.00 वा. सु. पुर्वी अजय जोगडे यांचे राहते घरा समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अजय जोगडे यांनी दि.29.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर :  तिर्थ खुर्द ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद येथील इंडस कंपनीच्या मोबाईल टॉवर मधील बॅटरी सेल व एक कॅसेट रेक्टीफायर डेल्टा मशीन एकुण 26,000₹ किंमतीचा माल दि.29.07.2023 रोजी 02.52 वा. सु. तिर्थ खुर्द येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महादेव पंडीत दवण, वय 39 वर्षे, धंदा खा. नोकरी रा. खंडा ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांनी दि.29.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 
धाराशिव  : आरोपी नामे-1) प्रशांत पाटील 2) रामेशवर खळदकर, अन्य तीन  यांनी वडीलांनी आय एफ एल फायन्स्‍ कडुन घेतलेले कर्जाचे हाप्ते वेळेत न भ्रण्याचे कारणावरुन दि.29.07.2023 रोजी 10.30 वा. सु. घाटंग्री येथे फिर्यादी नामे-विवेक तुकाराम हराळे, वय 28 वर्षे रा. घाटंग्री ता.जि. उस्मानाबाद यांना व  यातील आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोंखडी रॉडने, काठीने मारहाण केली. अशा मजकुराच्या विवेक हराळे यांनी दि.29.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद ग्रामीण पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 143, 147, 149, 324, 323, 504, अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

From around the web