उस्मानाबादेत तीन ठिकाणी चोरी  

कळंब आणि ढोकी  येथेही चोरीची घटना 
 
Osmanabad police

उस्मानाबाद  : राज्य उत्पादन शुल्क, उस्मानाबाद यांनी गुन्ह्यात जप्त केलेले फोर्स कार्गो स्टार वाहन क्र. एम.एच. 13 सीयु 4962 हे मध्यवर्ती प्रशासकीय ईमारतीच्या परिसरात लावलेले होते. दि. 14- 15 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री त्या वाहनाच्या पाठीमागील डाव्या बाजूचे चाक अज्ञाताने चोरुन नेले. यावरुन राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक- श्री. रफतअली कोतवाल यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : दिलीप शंकर घेवारे, रा. मेडसिंगा, ता. उस्मानाबाद यांनी दि. 16 सप्टेंबर रोजी 16.15 ते 16.30 वा. दरम्यान ख्वॉजानगर येथील ‘टि- सेंटर’ समोरील रस्त्यावर त्यांच्या मोटारसायकल क्र. एम.एच. 12 एपी 209 ला 50,000 ₹ रक्कम असलेली पिशवी अडकवली असता ती अज्ञाताने चोरुन नेली. अशा मजकुराच्या दिलीप घेवारे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद  : अरुण नरहारी कांबळे, रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद यांनी त्यांची हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्स 5037 ही दि. 15 सप्टेंबर रोजी 14.00 ते 15.00 वा. दरम्यान समर्थनगर येथरील रस्त्याकडेला लावली असता ती मो.सा. अज्ञाताने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या अरुण कांबळे यांनी दि. 16 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : महानंदा तुकाराम वाघ, वय 48 वर्षे, रा. पळसप, ता. उस्मानाबाद या दि. 16 सप्टेंबर रोजी आपल्या घरी झोपलेल्या असतांना रात्री 02.00 वा. सु. तीन अनोळखी पुरुष त्यांच्या घरात घुसून महानंदा यांच्या अंगावरील 27 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने जबरीने घेउन गेले. अशा मजकुराच्या महानंदा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 394, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब   : कळंब येथील दमयंती शिवाजी मते या दि. 13- 14 सप्टेंबर रोजी दरम्यान बाहेर गावी गेल्या असता दरम्यान त्यांच्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने तोडून घरातील अंदाजे 40 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, गॅस शेगडीसह टाकी असे इत्यादी साहित्य व 10,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या दमयंती मते यांनी दि. 16 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web