धाराशिव जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरी
लोहारा : फिर्यादी नामे- सयदाबाई चनबसप्पा उपासे, वय 70 वर्षे, रा. जेवळी उत्तर,ता. लोहारा जि. उस्मानाबाद यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.19.07.2023 रोजी 02.00 ते 07.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन देव घरात ठेवलेल्या पेटीतील सुवर्ण दागिणे व रोख रक्कम 20,000₹ असा एकुण 35,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या सयदाबाई उपासे यांनी दि.20.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 457, 380अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- अरुण रामलिंग आडे, वय 37 वर्षे, रा. शिंगोली, ता. जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 10,000₹ किंमतीची हिरां होंडा मोटरसायकल क्र एमएच 25 व्ही 0313 ही दि.18.07.2023 रोजी 13.00 वा. सु. दि.18.07.2023 रोजी 16.00 वा. सु. एमएच 25 फुड मॉलच्या जवळ असलेल्या पुलाखाली उस्मानाबाद येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या अरुण आडे यांनी दि.20.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : फिर्यादी नामे-प्रशांत प्रकाशराव कस्तुरे, वय 43 वर्षे, रा. ढोकी, ता. जि. उस्मानाबाद ह.मु. उस्मानाबाद यांचे पळसप शेतशिवार येथील विहीरीतील दोन्ही मोटारीचे 140 फुट फिनोलेक्स कंपनीचे 4 एमएम चे वायर अंदाजे 6,200 ₹ किंमतीचा हा दि.19.07.2023 रोजी 19.30 ते दि.20.07.2023 रोजी 10.30 वा. सु. पळसप शेतशिवार येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रशांत कस्तुरे यांनी दि.20.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.