धाराशिव जिल्ह्यात सहा ठिकाणी चोरीची घटना
मुरुम : फिर्यादी नामे- राहुल दिगंबर वाघ, वय 31 वर्षे, रा.माळी गल्ली, किसान चौक, मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव यांचे अंदाजे 12,000₹ किंमतीच्या एक शेळी व एक पिल्लु हे राहुल वाघ यांचे घरासमोरील मोकळ्या जागेत व आनंद विश्वनाथ सावंत यांचे अंदाजे 12,000₹ किंमतीच्या दोन शेळ्या आनंद सावंत यांचे घरातील मोकळ्या जागेतुन असा एकुण 24,000₹ किंमतीच्या तीन शेळ्या व एक पिल्लु हे दि.15.09.2023 रोजी 23.00 ते दि. 16.09.2023 रोजी 01.45 वा. सु. आरोपी नामे- सुनिलकुमार माणिक राठोड रा. कोल्डनगिरी तांडा, ता. आळंद जि. गुलबर्गा कर्नाटक व अनोळखी दोन इसम यांनी चोरुन नेल्या होत्या.अशा मजकुराच्या फिर्यादी राहुल वाघ यांनी दि.16.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-457, 380, 461 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच नमुद गुन्ह्याच्या तपासा दरम्यान मरुम पोलीसांनी आरोपी नामे- सुनिलकुमार माणिक राठोड रा. कोल्डनगिरी तांडा, ता. आळंद जि. गुलबर्गा कर्नाटक यास ताब्यात घेवून त्याचे कडुन नमुद गुन्ह्यात चोरी गेलेल्या तीन शेळ्या व एक पिल्लु असा एकुण 24,000₹ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
मुरुम : फिर्यादी नामे-अब्दुल कादर नबीलाल फरदु, वय 25 वर्षे, रा. सयदा गल्ली मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव यांचे शबीब हॉटेल मधील ड्रावर मधील रोख रक्क 5000 ₹, तसेच त्यांचे शेजारील ओमकार शिंदे यांचे किराणा दुकानातील रोख रक्कम व दुकानातील सामान 5,000₹, तसेच रशीद अझहर जमादार यांचे दुकानातील बुट, चप्पल व रोख रक्कम असे एकुण 3,000₹, तसेच अन्वर महमंद मकाम्मा यांचे कापड दकानातील जिन्स पॅन्ट, लहान मुलांचे कपडे एकुण 15,000₹, तसेच युसुफ ईब्राहिम मुल्ला यांचे किराणा दुकानातील सामान व रोख रक्कम 3000₹ असे एकुण 31,000₹ किंमतीचा माल हा दि. 12.09.2023 रोजी 22.30 ते दि. 13.09.2023 रोजी 04.00 वा. सु. सौदा गल्ली मुरुम येथील हॉटेल/ दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी अब्दुल कादर नबीलाल फरदु यांनी दि.16.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-461, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- शकंर हनुमंतराव डोलारे, वय 34 वर्षे, रा. बालाजी नगर, धाराशिव ह.मु.वैभव नगर लातुर यांची अंदाजे 50,000₹ किंमतीची होंडा शाईन मोटरसायकल क्र एमएच 25 एयु 9661 ही. दि.10.09.2023 रोजी 22.00 ते दि. 11.09.2023 रोजी 06.30 वा. सु. बालाजी नगर धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी शंकर डोलारे यांनी दि.16.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : दि.14.09.2023 रोजी 23.00 ते दि. 15.09.2023 रोजी 06.00 वा. सु. महालक्ष्मी देवीचे मंदीर महादेव गल्ली उमरगा येथील महालक्ष्मी मंदीराचे द्वाराचे लॉक अज्ञात व्यक्तीने तोडुन आत प्रवेश करुन मंदीरातील दानपेटी मधील अंदाजे रोख रक्कम 6,000ते 7,000₹ व देवीच्या डोक्यावरील 25 तोळ्याचा चांदीचा टोप, 7 तोळ्याचा चांदीचा मुकूट असा एकुण 18,200₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्याफिर्यादी नामे- सुरज पिराजेश ओव्हारे, वय 28 वर्षे, रा. महादेव गल्ली, उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.16.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब : फिर्यादी नामे- जयश्री दिपक जाधव, वय 45 वर्षे, रा. नाथनगर कृपासदन शाळेच्या पाठीमागे लातुर या दि.27.08.2023 रोजी17.15 ते 20.00 वा. सु. कळंब बसस्थानक येथुन कळंब ते लातुर बस ने प्रवास करत असताना जयश्री जाधव यांचे गळ्यातील 26.5 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र अंदाजे 1,41,500₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जयश्री जाधव यांनी दि.16.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे-प्रशांत दिलीप सुतार, वय 28 वर्षे, रा. महादेव मंदीर अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 35,000₹ किंमतीची एचएफ डिलक्स मोटरसायकल क्र एमएच 25 एएन 6652 ही. दि.14.09.2023 रोजी 23,00 ते दि. 15.09.2023 रोजी 07.00 वा. सु. सुहास कबाडे यांचे घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी प्रशांत सुतार यांनी दि.16.09.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम-379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.