उस्मानाबाद, परंडा, भूम येथे चोरी 

सांजा येथे एका महिलेस मारहाण 
 
Osmanabad police

उस्मानाबाद  : श्रीराम मधुकर लसणे, रा. तुळजापूर यांनी बाशी गट क्र. 112 मधील त्यांच्या शेतातील पत्रा शेडमध्ये ठेवलेले 35 पोती सोयाबीन व एक स्मार्टफोन दि. 07- 08 ऑक्टोबर दरम्यानच्या रात्री अज्ञाताने शेडची जाळी उचकटून नमूद माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या श्रीराम लसणे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

परंडा  : दयानंद गोरख बनसोडे, रा. परंडा यांच्या साई कॉलनी, परंडा येथील डी.बी. किराणा व जनरल स्टोअर्स दुकानाचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 07- 08 ऑक्टोबर दरम्यानच्या रात्री तोडून दुकानातील (टी- शर्ट, विजार, पायमोजे, टेनीस बॉल, क्रिकेट बॉल) खेळाचे साहित्य व 9,500 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या दयानंद बनसोडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

भुम  : पाथरुड, ता. भुम येथील शिवाजी बोराडे, निलेश बसाड व बालाजी गव्हाणे या तीघांच्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 08 ऑक्टोबर रोजी 00.30 ते 03.00 वा. दरम्यान उघडून बोराडे यांच्या घरातील 30 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, 10,000 ₹ रोख रक्कम व बसाड यांच्या घरातील 5,000 ₹ रोख रक्कम आणि गव्हाणे यांच्या घरातील 10 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या शिवाजी बोराडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
मारहान

उस्मानाबाद  : माधुरी शिंदे, रा. सांजा, उस्मानाबाद या दि. 08 ऑक्टोबर रोजी 04.00 वा. सु. कुटूंबीयांसह घरात झोपलेल्या होत्या. दरम्यान नातेवाईक- सुनिल शिंदे, श्रावण शिंदे, अजय शिंदे, तीघे रा. सुंभा, जम्या भोसले, अप्पा भोसले, दोघे रा. भातंब्रा अशा पाच व्यक्तींनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन माधुरी यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, कोयत्याने मारहान करुन केली. यात माधरी यांच्या उजव्या हाताचे हाड मोडले. अशा मजकुराच्या माधुरी शिंदे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                              

From around the web