उमरग्यात रात्रगस्ती दरम्यान दोघे संशयीत ताब्यात

 
Osmanabad police

उमरगा  : उमरगा पो.ठा. चे पथक दि. 04.09.2021 रोजी 01.30 वा. सु. रात्रगस्तीस असतांना उमरगा शहरातील बालाजीनगर परिसरात मुंगळे शिकवणीच्या आडोशाला दोन अल्पवयीन (विधीसंघर्षग्रस्थ) बालके संशयास्पदरित्या थांबलेले आढळले. अशा अवेळी तेथे उपस्थित असण्याच्या कारणांबाबत पथकाने त्या दोघांना विचारले असता ते दोघे असंबध्द माहिती देत असल्याने पोलीसांनी त्यांची झडती घेतील असता त्यातील एकाजवळ करवत पान (हेक्सा ब्लेड) आढळले. यावर त्या दोघांना ताब्यात घेउन त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम- 122 सह भा.दं.सं. कलम- 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


दोन बैल चोरीस 

उमरगा: व्यंकट गोविंद सुगावे, रा. माडज, ता. उमरगा यांनी त्यांच्या घरासमोर ठेवलेले दोन बैल दि. 02- 03 सप्टेंबर रोजीच्या रात्री अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या व्यंकट सुगावे यांनी दि. 04 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


घराचे नुकसान करणाऱ्यावर गुन्हा दाखल

येरमाळा : येडशी येथील राहुल मोरे यांनी पुर्वीच्या वादावरुन वडगांव (ज.) येथील सोनम माळवदे यांच्या घराचे कुलूप दि. 04 सप्टेंबर रोजी 00.30 वा. सु. तोडून घरात पेट्रोल टाकून घर पेटवून दिले. यात माळवदे यांच्या घरातील साहित्य इत्यादी जळुन अंदाजे 2,00,000 ₹ किंमतीचे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या सोनम माळवदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 436 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


महिलेचा विनयभंग

उस्मानाबाद  : एक 50 वर्षीय महिला (नाव- गाव गोपनीय) दि. 04 सप्टेंबर रोजी 15.30 वा. सु. तीच्या घरात एकटी असत्याची संधी साधून गावातीलच एका पुरुषाने कामानिमीत्त त्या महिलेला घराबाहेर बोलावून तीच्या सोबत झोंबाझोंबी करुन तीचा विनयभंग केला. यावेळी त्या महिलेने त्यास प्रतीकार केला असता त्याने तीला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहान केली. तसेच घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीला ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या संबंधीत महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 354, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web