शेतातील विहिरी व तलावातील इलेक्ट्रीक पाणबुडी मोटार चोरणाऱ्या चोरट्यास अटक
ढोकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांत मागील काही दिवसांपासून शेतातील विहिरी व तलावातील इलेक्ट्रीक पाणबुडी मोटार चोरीचे प्रमाण वाढले होते. याप्रकरणी ढोकी पोलिसांनी एका चोरट्यास अटक करून २३ इलेक्ट्रीक पाणबुडी मोटार हस्तगत केल्या आहेत.
कुंदन राजेंद्र काळे ( वय २७, रा. राजेशनगर , ढोकी ) असे या चोरट्याचे नाव आहे, या चोरट्याकडून पोलिसांनी २३ इलेक्ट्रीक पाणबुडी मोटार हस्तगत केल्या आहेत. त्याची किंमत साधारण २० हजार रूपये प्रमाणे ४ लाख ४० हजार इतकी आहे.
ढोकी पोलीस स्टेशनचे सपोनि जगदीश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बुद्धेवर , सपोफौ सातपुते, गवळी. पोहेकॉ शेळके, पोलीस नाईक क्षिरसागर, तरटे , पोकॉ शिंदे, पांडे, गोडगे, थाटकर यांनी या चोरीचा छडा लावला. आरोपी कुंदन राजेंद्र काळे याने आणखी कुठे कुठे चोऱ्या केल्या याचा तपास ढोकी पोलीस करीत आहेत.