लोहाऱ्यात बियर बारचा मालक निघाला वीज चोर 

 वीज चोरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल
 
Osmanabad police

लोहारा : चेतनकुमार लक्ष्मण बोंडगे यांनी जेवळी रोड, लोहारा येथील ‘चेतन बार ॲन्ड परमिट रुम’ करीता विद्युत मीटरच्या पाठीमागून तारा जोडून जुलै - सप्टेंबर 2021 या कालावधीत एकुण 9257 युनिट वीज चोरी केली असल्याचे महावितरण कार्यालयाच्या भरारी पथकास आढळले. यावरुन अतिरिक्त अभियंता- प्रदिप मोरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन वीज अधिनियम कलम- 135 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लॉकडाऊनमुळे अनेकांकडे पैसे नसल्यामुळे विजेची चोरी करीत असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. मात्र लोकांना दारूची नशा चढवून पैसे उकळणारा एखादा बियर बार परमिटवाला विजेची चोरी करील यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. जर कोणी असे सांगितले तर  अनेकजण त्याला बेवडा म्हणाल्या शिवाय राहणार नाहीत. मात्र बिअर बार परमिट रूम चालविणाऱ्या व्यावसायिकाने चक्क ९२५७ युनीट विजेची चोरी केल्याचे वास्तव समोर आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, लोहारा येथील चेतनकुमार लक्ष्मण बोंडगे यांनी जेवळी रोड, येथील चेतन बार एन्ड परमिट रुमसाठी विद्युत मीटरच्या पाठीमागून तारा जोडून जुलै - सप्टेंबर २०२१ या कालावधीत एकुण ९२५७ युनिट वीज चोरी केली असल्याचे महावितरण कार्यालयाच्या भरारी पथकास आढळले. या प्रकरणी अतिरिक्त अभियंता प्रदिप मोरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या तक्रारीवरून वीज अधिनियम कलम १३५ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

 
मारहाण 

तामलवाडी : सुरेश कुमार गव्हाणे, रा. वडगांव (काटी), ता. तुळजापूर हे त्यांचे चुलते व चुलत भावासह दि. 07.09.2021 रोजी 14.00 वा. सु. हाटकरवाडी (सा.) येथील गट क. 21 मघील त्यांच्या शेतात होते. यावेळी सुरेश यांच्या पडीक जमीनीवर गावकरी- शिवाजी चोपडे, पोपट चोपडे, बिभिषण गोपने, रमेश गोपने हे चौघे त्यांची जनावरे चारत होते. यावर सुरेश यांनी नमूद चौघांना जनावरे न चारण्यास सांगीतले असता त्यांनी सुरेश यांसह त्यांच्या चुलत्यांस ‍व चुलत भावास शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, प्लास्टीक नळ, काठीने मारहान करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुरेश गव्हाणे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कोरोना संसर्गाची निष्काळजीपनाची कृती करणाऱ्यास 500 ₹ दंड

परंडा  : परंडा पो.ठा. हद्दीत कोविड- 19 संसर्ग होण्याची निष्काळजीपनाची कृती करणाऱ्या सागर दशरथ रामगुडे यांनी भा.दं.सं. कलम- 269 चे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना 500 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी आज दि. 08 सप्टेंबर रोजी शिक्षा सुनावली आहे.

                                                                                              

From around the web