चुलत बहिणीला वाईट बोलणाऱ्यास  लाथाबुक्यांनी केली मारहाण आणि पुढे घडले विपरीत ...

 
crime

आंबी  : तांदुळवाडी, ता. परंडा  येथील- उमेश भिमराव आडसुळ यांनी त्यांचे चुलत बहिण यांना वाईट बोलण्याच्या कारणावरुन दि.30.04.2023 रोजी 21.00 वा. सु. तांदुळवाडी येथे गावकरी- संतोष प्रभाकर चौधरी, वय 41 वर्षे, यांना लाथाबुक्यांनी मारहान करुन ढकलून दिले. यात संतोष  यांना दगडाने डोक्यावर मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले. अशा मजकुराच्या विक्रांत दिलीप हिंगे यांनी दि.09.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 323 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

  लैंगीक अत्याचार

शिराढोण  : एका गावातील एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि.21.01.2021 ते 06.06.2023 रोजी पावेतो सदर मुलगी ही एकटी असताना गावातील एका तरुणाने सदर मुलीगी ही एकटी असल्याचा फायदा घेवून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तीच्यावर वेळोवेळी लैंगीक अत्याचार केला. दोन तरुणांनी घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतीची आई यांनी दि.09.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम-376, 504, 506, 34 सह पोस्को  कलम 4, 8, 12 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web