कळंबमध्ये बसचालकाच्या खुनाला अखेर वाचा फुटली 

बायकोने  प्रियकराच्या मदतीने पतीला संपवून आत्महत्या भासवले
 
Osmanabad police

कळंब  - कळंबमध्ये बसचालकाच्या खुनाला अखेर वाचा फुटली आहे. बायकोने  प्रियकराच्या मदतीने पतीला संपवून आत्महत्या भासवले होते मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे बायको आणि तिच्या प्रियकराला बेड्या पडल्या आहेत. 

घडले असे की, कळंब येथे एसटी महामंडळात बसचालक म्हणून भीमराव रंगनाथ खराटे (५२, रा. भोगजी, ता. कळंब) कार्यरत हाेते. मांगवडगाव (ता. केज) शिवारातील धनराज थोरात यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी युसुफवडगाव पोलिस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. 

याप्रकरणी भीमराव यांचे बंधू बालाजी खराटे यांचा संशय पत्नी, मुलगा व प्रियकर यांच्यावर होता. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नव्हता म्हणून बालाजी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी ११ सप्टेंबर रोजी न्यायालयाच्या आदेशावरून पत्नी राधाबाई भीमराव खराटे (४८), प्रियकर महादेव ऊर्फ बबन अच्युत खराटे (४०) मुलगा सिध्देश्वर भीमराव खराटे (२८, सर्व रा. भोगजी, ता. कळंब) यांच्याविरोधात युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विजय आटोळे तपास करत आहेत. तिन्ही आरोपी फरार आहेत.

तीन महिन्यांनंतर प्रकरणाचा उलगडा झाला आहे. प्रेम प्रकरणात अडसर ठरत असल्याने तसेच अनुकंपा तत्त्वावर मुलाला नोकरी लावण्यासाठी भीमराव खराटे यांचा सिनेस्टाइल काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

From around the web