भावानेच भावाचा वडिलांचा मदतीने केला खून 

आरसोली खून प्रकरणातील फिर्यादीच निघाला आरोपी 
 
d
भूम तालुक्यातील खुनाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश 

परंडा    : भूम तालुक्यातील आरसोली येथील खुनाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मयताच्या भावाने खुनाची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. पण फिर्याद देणारा भाऊच आरोपी निघाला असून, वडिलांच्या मदतीने त्याने भावाचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. 


खुनाच्या आरोपातील जामिनावर सुटलेला विलास आबासाहेब गोयकर, वय 33 वर्षे आरोपीचा खून  झाला होता,.हा आरोपी पुण्यात राहत असून, तारखेसाठी आला असता त्याचा खून झाला होता. 

आरसोली, ता. भुम येथील विलास आबासाहेब गोयकर, वय 33 वर्षे यांचा गळ्यावर शस्त्राच्या वाराच्या जखमा असलेला मृतदेह 23 सप्टेंबर रोजी देवळाली ते आरसोली रस्त्यालगतच्या चारीत आढळला. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी विलास याचा खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह त्या चारीत टाकला आहे. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- दिलीप आबासाहेब गोयकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 201 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास शेतकरी हनुमंत भास्कर जगदाळे हे सोयाबीनचे रस्त्याच्या कडेला ढिग लावण्यासाठी जागा करत होते. त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत डोके दिसले. त्यांनी जवळ जाऊन पाहिल्यावर डोळ्यांवर कापडी पट्टी लावलेल्या व्यक्तीचा मृतदेह दिसून आला. त्यामुळे त्यांनी देवळालीचे सरपंच सचिन माने यांना याबाबतची माहिती दिली. माने यांनी परंडा पोलिसांना फोन करुन माहिती दिली. त्यानंतर तत्काळ पोलिस घटनास्थळी आले. पोलिसांनी परंडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनिल गिड्डे यांना याबाबत कळवले. त्यानंतर गिड्डे यांनी मृतदेहाची पाहणी करून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कळवले. गिड्डे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला होता. 

फिर्यादी भाऊच निघाला आरोपी 

या खून प्रकरणी फिर्याद देणारा भाऊ दिलीप गोयकर हाच आरोपी निघाला असून त्यानेच आपल्या वडिलांच्या मदतीने आपला भाऊ विलास गोयकर याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दिलीप गोयकर आणि त्याचा वडील आबासाहेब गोयकर यास बेड्या ठोकल्या आहेत. 

अवघ्या 12 तासांत खूनाचा उलगडा

d

आरसोली, ता. भुम येथील विलास आबासाहेब गोयकर, वय 33 वर्षे यांच्या गळ्यावर शस्त्राच्या वाराच्या जखमा असलेला मृतदेह 23 सप्टेंबर रोजी देवळाली ते आरसोली रस्त्यालगतच्या चारीत आढळला होता. अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी विलास यांचा खून करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह त्या चारीत टाकला आहे. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- दिलीप आबासाहेब गोयकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो.ठा. गु.र.क्र. क्र. 322 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 302, 201 अंतर्गत नोंदवला आहे.

            गुन्हा तपासादरम्यान कळंबचे सहायक पोलीस अधीक्षक-. आर. रमेश यांसह पोनि-  गजानन घाडगे यांच्यासह स्था.गु.शा. च्या पथकाने व पोनि- सुनिल गीड्डे यांच्यासह परंडा पो.ठा. च्या संयुक्त पथकाने तपास सुरु केला. मयताचा पिता- आबासाहेब रामलिंग गोयकर यांसह फिर्यादी भाऊ- दिलीप यांस वेगळे करुन सखोल विचारपूस केली असता दोघांच्या बोलण्यास तफावत आढळली. एकंदरीत विलास गोयकर (मयत) याने दि. 21.09.2021 रोजी रात्री मद्यधुंद अवस्थेत भाऊ- दिपक यास नित्याप्रमाणे शिवीगाळ करुन धक्काबूक्की केली. यातून चिडून जाउन दिलीप याने भाऊ विलास याच्या डोक्यात गळ्यावर कुऱ्हाडीचे घाव घातल्याने त्याचा मृत्यू झाला. यानंतर त्याने पिता- आबासाहेब यांच्या सहकार्याने विलास याचा मृतदेह पोत्यात भरून मोटारसायकवरून वाहून नेउन त्या चारीत टाकल्याचे निष्पन्न होताच त्या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणांहुन अटक करण्यात आली.

 

From around the web