नळदुर्गमध्ये सामाजिक तेढ निर्माण करणारा आरोपी मोकाट 

 
crime

नळदुर्ग  - नळदुर्गमध्ये काही दिवसापूर्वी दोन गटात हाणामारी झाली होती. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या दोन्ही गटातील लोकांवर नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल  करण्यात आला होता. त्यानंतर  दोन्ही गटातील काही लोकांना अटक करण्यात आली होती. मात्र एका गटातील  मुख्य आरोपी फरार झाला होता. त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून देखील पोलीस त्यास पोलीस अटक करीत नाहीत. हा आरोपी 'शाहीन' मारत गावात मोकाट आणि उजळ माथ्याने फिरत असताना, पोलीस त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे. 

या आरोपीने शहरात गुंडगिरी करून दहशत निर्माण केली असताना , पोलीस बोटचेपेपणा करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


महाराणा प्रताप यांचे स्टेट्स ठेवणाऱ्या तरुणास बेदम मारहाण 

नळदुर्गमध्ये किल्ला गेट परिसरातील  एका कुख्यात आरोपीने काही अल्पवयीन मुलांना घेऊन शहरात गुंडगिरी करून दहशत निर्माण केली आहे. या किल्ला गेट टोळक्याने  येडोळा येथील एका तरुणास काही दिवसापूर्वी बेदम मारहाण केली होती. 

 येडोळा येथील एका तरुणाने व्हाट्स अँपवर महाराणा प्रताप यांचे स्टेटस ठेवले होते. हे स्टेट्स का ठेवले म्हणून त्या तरुणास किल्ला गेट  टोळक्याने बेदम मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल न करता, आरोपीना अभय दिले. 


दिल्लीतील तरुणीला नळदुर्गमध्ये आणणाऱ्या तरुणास बेदम मारहाण 

येणेगूर येथील एका तरुणाने दिल्लीतील एका तरुणीस लग्न करून गावी नेत असताना, नळदुर्गमध्ये किल्ला गेट टोळक्याने त्यांना पाहिले.. आमच्या जातीची मुलगी पळवून आणतो का म्हणून येणेगूरच्या तरुणास बेदम मारहाण केली. नंतर दिल्लीच्या तरुणीला अणदूरकडे नेत  असताना, पोलिसांनी त्यांना पकडले आणि पोलीस स्टेशनमध्ये आणले. रात्रभर या टोळक्यास बसवून ठेवले आणि सकाळी सोडून दिले. 

येणेगूरच्या तरुणास विनाकारण बेदम मारहाण करणाऱ्या किल्ला गेट टोळक्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई  केली नाही. तसेच दिल्लीच्या तरुणीला त्यांच्या नातेवाईकांना बोलावून हवाली केले.या प्रकरणात पोलिसांनी  किल्ला गेट टोळक्यास पुन्हा एकदा अभय दिले. 

From around the web