तामलवाडी : लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यात वधूची आत्महत्या , हे आहे कारण ...
तामलवाडी : सावरगाव, ता. तुळजापूर येथील- प्रतिक्षा स्वप्नील मगर, वय 19 वर्षे, यांनी लग्न झाल्याचे सहा महिने ते दि. 03.05.2023 रोजी पर्यंत सावरगाव येथे गळफास घेउन आत्महत्या केली. सावरगाव, ता. तुळजापूर येथील- वैभव फंड, हनुमान दरेकर यांनी वेळोवेळी दिलेल्या जाचास व त्रासास कंटाळून प्रतिक्षा यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचे वडील- मनोज सुरेश खुणे रा. अभिषेक नगर सोलापूर यांनी दि. 10.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 34अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
रस्ता अपघात
येरमाळा : येरमाळा, ता. कळंब येथील- किरण कल्याण कोकाटे, वय 27 वर्षे हे दि.12.05.2023 रोजी दुपारी 13.00 वा. सु. येरमाळा रोड ते बार्शी जाणारे रोडवर आशीर्वाद हॉटेल समोर येरमाळा येथुन मोटरसायकल क्र एमएच 23 बीजी 4317 वरुन जात होते. दरम्यान स्वीफट डिझायर कार क्र एम एच 12 केजे 1125 चा चालकाने त्यांचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून किरण यांना उजव्या बाजूने समोरुन धडक दिली. या आपघातात किरण हे गंभीर जखमी होऊन उपचार दरम्यान मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाउ- कृष्णा कल्याण कोकाटे यांनी दि.10.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.