तामलवाडी : सुनेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरकडील लोकांवर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

तामलवाडी : श्रीमती नेहा रंगनाथ लोहार, वय 19 वर्षे, रा. पांगरधरवाडी, ता. तुळजापूर यांनी 22.09.2021 रोजी आत्महत्या केली. नेहा यांनी माहेरहून संसार उपयोगी साहित्य आणावे यांसाठी रंगनाथ सिध्देश्वर लोहार (पती), लता लोहार (सासू) या दोघांनी वेळोवेळी नेहा यांचा शारिरीक व मानसिक छळ केल्याने या छळास कंटाळून नेहाने आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या नेहा यांचे पिता- सुनिल महादेव लोहार यांनी अनैसर्गीक मृत्यू क्र. 31 / 21 फौ.प्र.सं. कलम- 174 च्या चौकशीत दिलेल्या जबाबावरुन भा.दं.सं. कलम- 306, 498 (अ), 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.  

 हाणामारीचे दोन गुन्हे दाखल 

नळदुर्ग  : काळेगाव, ता. तुळजापूर येथील कुमार शेंडगे, पप्पु शेंडगे, अर्जुन शेंडगे, कान्होपात्रा शेंडगे अशा चौघांनी पुर्वीच्या वादावरुन दि. 22 सप्टेंबर रोजी 22.00 वा. सु. गावकरी- बबीता शिंदे यांसह त्यांचे पती- विनोद शिंदे, आई व मुलगा यांना राहत्या गल्लीत शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या बबीता शिंदे यांनी दि. 23 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : शेतात जनावरे चारण्याच्या कारणावरुन परमेश्वर कोंडीबा मराळे, रा. गोलेगाव, ता. वाशी यांना दि. 17 सप्टेंबर रोजी 18.00 वा. सु. ईसरुप शेत शिवारात सुमित कांबळे, गोवर्धन कांबळे, रतन कांबळे, सटवा कांबळे, सर्व रा. ईसरुप, ता. वाशी यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या परमेश्वर मराळे यांनी दि. 23 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                               

                                                                               

From around the web