टाकळी : इलेक्ट्रीक्स दुकानास आग लावून नुकसान करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

बेंबळी : टाकळी येथील चंद्रकांत विश्वंभर खटके यांच्या मुलाची व ग्रामस्थ- मनोहर श्रीपती गाडेकर यांची दि. 30.10.2021 रोजी 18.00 वा. सु. भांडणे झाली होती. याचा राग मनात धरुन चंद्रकांत खटके यांनी मनोहर गाडेकर यांच्या गावातील इलेक्ट्रीक्स दुकानास रात्री 22.30 वा. सु. आग लावून अंदाजे 5,00,000 ₹ रकमेचे आर्थिक नुकसान केले. अशा मजकुराच्या मनोहर गाडेकर यांनी दि. 31.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाणीच्या तीन घटना 

बेंबळी  : गोगांव, ता. उस्मानाबाद येथील बालाजी पाटील, धर्मराज भोसले, रोहन पाटील यांना बडापाव खाल्ल्याचे पैसे ग्रामस्थ- दत्तात्रय सरक यांनी दि. 30.10.2021 रोजी गोगाव फाटा येथील पानटपरीजवळ मागीतले असता नमूद तीघांनी दत्तात्रय यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी सळईने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या दत्तात्रय सरक यांनी दि. 31.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

वाशी : महालदारपुरी, ता. वाशी येथील अरुण किसन गवारे यांनी पुर्वीच्या भांडणावरुन दि. 30.10.2021 रोजी 19.45 वा. सु. भाऊ- काकासाहेब गवारे यांना त्यांच्या राहत्या घरासमोर शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड, लोखंडी गजाने मारहान करुन त्यांना जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या काकासाहेब यांनी दि. 31.10.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

ढोकी  : तेर, ता. उस्मानाबाद येथील कानडे कुटूंबातील विष्णु, राजेंद्र, खंडू, विजय, अर्जुन या सर्वांनी पुर्वीच्या वादावरून दि. 31.10.2021 रोजी 19.30 वा. सु. गावातील होळकर चौकात भाऊबंद- तिरुपती कानडे यांना शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, चप्पल, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या तिरुपती कानडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web