तुळजापुरात रात्रगस्ती दरम्यान संशईत इसम ताब्यात

 
crime

तुळजापूर  : तुळजापूर पो.ठा. चे पथक दि. 01.08.2023 रोजी 21.30 वा. सु. तुळजापूर शहरात रात्रगस्तीस असताना दरम्यान शहरातील बस आगाराचे भिंतीचे ओल सावलीत बसस्थानक तुळजापूर येथे अंधाराचा दबा धरुन बसलेल्या दोन इसमास संशयावरुन पथकाने हाटकले. यावर त्यांची विचारपुस केली असता त्यांनी आपली नावे-1) प्रकाश विजय जाधव, वय 49 रा.रा. औरंगपूरा, ता. शिरुर कासार जि. बीड, 2) करण नारायण गायकवाड, वय 20 वर्षे, मेहबुबगंज पेठ चावडीच्या शेजारी निलंगा ता. निलंगा जि. लातूर असे सांगीतले. पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्यांनी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ते माला विरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

चोरी 

परंडा  : फिर्यादी नामे- महेश दशरथ मोरे, वय 24 वर्षे, रा. सोनारी ता. परंडा जि. उस्मानाबाद यांची राम मंदीरा जवळ सिना कोळेगाव धरनाजवळ रोडलगतची 50 मिटर केबल अंदाजे 2,000₹ किंमतीची  व इतर शेतकऱ्यांची इलेट्रीक मोटारीची वायर किंमत अंदाजे 38,800 ₹ असा एकुण 40,800₹ किंमतीची 1,020 मिटर वायर दि.02.08.2023 रोजी 16.00 वा. सु. चोरुन नेले होते. अशा मजकुराच्या महेश मोरे यांनी दि.02.08.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात परंडा पो ठाणे च्या पथकाने आरोपी नामे-विनायक मिश्रीलाल चव्हाण रा. शीरी ता. आष्टी जि. बीड यास गोपणीय माहितीच्या आधारे ताब्यात घेवून त्याचकडे चौकशी केली असता सदर आरोपीने गुन्ह्याची कबूली दिली. व त्याचे कब्जातुन चोरीस गेलेला वरील वर्णनाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शस्त्र कायद्यांतर्गत गुन्हा नोंद

ढोकी  : ढोकी पो.ठा. चे पथक दि. 02.08.2023 रोजी 11.30 वा. सु. ढोकी पोठा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना आरोपी नामे- सुनिल श्रीपती काळे, वय 48 वर्षे, रा. पळसप, ता. जि. उस्मानाबाद हा लोकांचे जिवीत धोक्यात येईल असे अंदाजे लोखंडी मुठ असलेली तलवार अंदाजे किंमत 1,500 ₹ ही बेकायदेशीररीत्या कब्जात बाळगून असताना ढोकी पोठाचे पथकास आढळला. यावर पथकाने सुनिल श्रीपती काळे यास ताब्यात घेउन त्यांच्या जवळील ती तलवार जप्त करुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन शस्त्र कायदा कलम- 4, 25 अन्वये ढोकी  पो. ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे

From around the web