तुळजापुरात रात्रगस्ती दरम्यान संशयीत ताब्यात

 
Osmanabad police

तुळजापूर  : तुळजापूर पो.ठा. चे पथक दि. 22 ऑक्टोबर रोजी 20.00 वा. सु. तुळजापूर शहरात रात्रगस्तीस असतांना शहरातील दिपक चौकातील एका टपरीमागील अंधारात विक्रम महादेव गायकवाड, रा. पुणे हा संशयास्पदरित्या वावरत असलेला आढळला. अवेळी तेथे उपस्थित असण्याच्या कारणांबाबत पथकाने त्यास विचारले असता तो असंबध्द माहिती देत असल्याने पोलीसांनी त्यास ताब्यात घेउन त्याच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम- 122 अंतर्गत तुळजापूर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.


चोरीचे दोन गुन्हे 

उस्मानाबाद  : एकनाथ वानकर, रा. टाकळी (पिर), ता. मोहोळ यांनी त्यांची हिरो एचएफ डिलक्स मो.सा. एम.एच. 13 सीएल 1552 ही तुळजापूर येथील छ. शिवाजी महाराज चौकात दि. 07 ऑक्टोबर रोजी 0045 ते 02.00 वा. दरमयान लावली असता अज्ञाताने ती चोरुन नेली.

दुसऱ्या घटनेत किरण राठी, रा. उस्मानाबाद यांनी त्यांची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल उस्मानाबाद येथील चौपाटी परिसरात दि. 17 ऑक्टोबर रोजी 14.30 ते 15.00 वा. दरम्यान लावली असता अज्ञाताने ती चोरुन नेली. यावरुन अनुक्रमे तुळजापूर व आनंदनगर पो.ठा. येथे भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web