उमरग्यात रात्रगस्ती दरम्यान संशईत इसम ताब्यात

 
crime

उमरगा  : उमरगा पो.ठा. चे पथक दि. 18.01.2023 रोजी 01.15 वा.सु. उमरगा शहरात रात्रगस्तीस असताना दरम्यान शहरातील आरती मंगल कार्यालयाच्या बाजूला अंधाराचा दबा धरुन बसलेल्या एका इसमास संशयावरुन पथकाने हाटकले. यावर त्याची विचारपुस केली असता त्याने आपले नाव- सागर कुडंलिक माने, वय 20 रा. पतंगे रोड, उमरगा ता.उमरगा जि. उस्मानाबाद असे सांगीतले. 
पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्याने पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तो माला विरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.


दुचाकी वाहनांची चोरी 

धाराशिव  : फिर्यादी नामे- संघरक्षीत गोकुळ गायकवाड, वय 42 वर्षे, रा. शाहुनगर, उस्मानाबाद यांची मोटरसायकल पॅशन प्रो क्र  एमएच 22 एल 8299 ही दि.14.07.2023 रोजी 11.30 वा. सु ते दि 15.07.2023 रोजी 13.00 वा. सु उस्मानाबाद बस स्थानक येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या संघरक्षीत गायकवाड यांनी दि.18.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web