येरमाळा यात्रेत सुरट व टायगर जुगार , २१ जणांवर कारवाई 

 
crime

येरमाळा - येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा ६ आणि ७ एप्रिल रोजी पार पडली. या यात्रेत चोरांचा सुळसुळाट झाला होता तर अवैध धंदे बोकाळले होते. यात्रेत सुरट व टायगर जुगार उघड उघड सुरु होता.याप्रकरणी पोलिसांनी  २१ जणांवर कारवाई केली आहे. 

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी  यांच्या  आदेशान्वये येरमाळा यात्रा येथे अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. 08.04.2023 रोजी येरमाळा यात्रा येथे पथक तयार करुन त्यांना गोपनीय माहिती काढुन येरमाळा यात्रा येथे सुरट व टायगर नावाचा जुगार खेळणारे विरुध्द कारवाई करणेसाठी सांगण्यात आले होते. 

सदरचे पथक यांनी गोपनिय माहीती मिळाली की, येरमाळा यात्रा येथे एकुण 21 जुगार खेळणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यांचेकडुन एकुण 16310/- रु रोख रक्कम व 06 मोबाईल पोलीसांनी जप्त केला असुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
 

From around the web