लोहाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची आत्महत्या

लोहारा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस हणमंत दणाने ( वय ४० ) यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली आहे. हणमंत दणाने यांच्या खिशात एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात तिघांची नावे आहेत. हे तिघेच आपल्या मृत्यूस कारणीभूत असून, त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, असे त्यांनी लिहिले आहे.
मयत हणमंत दणाने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस तसेच लातूर जिल्हा निरीक्षक आणि वडगाव (गांजा) गावच्या तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष होते. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या लोकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
हणमंत दणाने यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे, लोहारा पोलीस अधिक तपास करीत आहेत.