पेठसांगवीत सासरच्या घरात जावयाची आत्महत्या 

 
Osmanabad police

लोहारा  : प्रशांत रमेश चंदनशिवे, वय 26 वर्षे, रा. वंजारवाडी, ता. भुम यांनी दि. 27 सप्टेंबर रोजी 19.00 वा. सु. पेठसांगवी, ता. लोहारा येथील सासरच्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. “माझ्या मरणास माझी पत्नी, सासु- सासरे, मेहुना- मेहुनी हे जबाबदार आहेत.” अशी स्वहस्ताक्षरातील चिठ्ठी मयताच्या खिशात आढळल्याने मयताचे पिता रमेश रामलिंग चंदनशिवे यांनी दि. 28 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण 

तामलवाडी  : मसला (खु.), ता. तुळजापूर येथील नागेश लक्ष्मण जाधव यांच्या घरासमोरील रस्त्यावर शेजारील- सुरेश नरवडे यांनी मुरुम टाकल्याने पावसाचे पाणी साठू लागले. यावर दि. 27 सप्टेंबर रोजी 06.30 वा. सु. नागेश जाधव यांनी सुरेश यांना त्या बाबत विचारणा केली असता सुरेश यांसह दिपक नरवडे, राहुल नरवडे, रमेश नरवडे, प्रमोद नरवडे, विनोद नरवडे, दादाराव नरवडे अशा सातजणांनी नागेश यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी टामीने मारहान केली. यात नागेश यांच्या नाका- तोंडास मार लागून एक दात पडून ते गंभीर जखमी झाले. यावेळी नागेश यांच्या बचावास आलेल्या त्यांच्या आई- वडीलांसही नमूद सर्वांनी शिवीगाळ करुन मारहान केली. अशा मजकुराच्या नागेश जाधव यांनी दि. 28 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 326, 323, 504, 143, 147, 148 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

कळंब : अरुणा संजय करंजकर, रा. कळंब यांच्या पती व मुलाच्या नावे असलेल्या मालमत्तेची कागदपत्रे भाटसांगवी, ता. कळंब येथील बंडु चांगदेव कोल्हे व अजित कोल्हे या दोघा पिता- पुत्रांकडे होते. ती कागदपत्रे अरुणा यांनी दि. 28 सप्टेंबर रोजी 12.30 वा. भाटसांगवी येथे कोल्हे पिता- पुत्रांस मागीतले. यावर नमूद दोघांनी चिडून जाउन अरुणा यांसह त्यांचा मुलगा- ओम यास शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन लोखंडी गजाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या अरुणा करंजकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                              

From around the web