लोहाऱ्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची आत्महत्या 

आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या तिघांवर अखेर गुन्हा दाखल
 
zs

लोहारा :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस हणमंत दणाने ( वय ३६ ) यांच्या आत्महत्या प्रकरणी तिघांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हाणमंत प्रभाकर दणाने, वय ३६  वर्षे, रा. वडगाव (गांजा), ता. लोहारा यांनी दि. 25 सप्टेंबर रोजी 10.30 वा. सु. गावातील बाजार तळावरील पत्रा शेडमध्ये गळफास घेउन आत्महत्या केली होती. 

 गावकरी- मायादेवी गायकवाड, स्वाती गायकवाड, दत्तात्रय गायकवाड या तिघांसोबत हाणमंत दणाने यांचा जुना आर्थिक व्यवहार होता. या कारणावरुन ते तिघे हाणमंत यांना वेळोवेळी मानसिक त्रास देत असल्याने या त्रासास कंटाळून हाणमंत यांनी आत्महत्या केली आहे, अशा मजकुराच्या मयताचे पिता- प्रभाकर दणाने यांनी दि. २६ सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

हणमंत दणाने यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे, लोहारा पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

From around the web