उस्मानाबादेत चोऱ्या करणारा अट्टल आरोपी गजाआड 

चोरीचे 60 ग्रॅम सुवर्ण दागिने, भ्रमणध्वनी व मोटारसायकल जप्त 
 
x

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या चोऱ्या करणाऱ्या एका आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून चोरीचे 60 ग्रॅम सुवर्ण दागिने, भ्रमणध्वनी व मोटारसायकलसह जप्त केले आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील माला विषयीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्था.गु.शा. च्या पोनि- . गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील पोउपनि- पांडुरंग माने, पोना- अमोल चव्हाण, पोकॉ- आरसेवाड, मरलापल्ले, कोळी, गोरे यांचे पथक काल दि. 25 सप्टेंबर रोजी पहाटे गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, पाटोदा पाटी येथील अजय दिलीप भोसले, वय 20 वर्षे हा काही दिवसांपासून चोरीचे सुवर्ण दागिने, भ्रमणध्वनी व मोटारसायकल संशयीतरित्या बाळगून आहे. यावर पथकाने अजय भोसले यास ताब्यात घेतले असता तो ढोकी पो.ठा.-3, उस्मानाबाद (ग्रा.)- 1, उस्मानाबाद (श.)- 1, शिराढोन- 1 व बेंबळी पो.ठा. 1 अशा एकुण 7 चोरी- घरफोडीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे समजले.

पथकाने त्याच्या ताब्यात असलेले 60 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, मोटारसायकल व भ्रमणध्वनी बाबत मालकी- ताबा या विषयी त्यास विचारले असता त्याने समाधानकारक माहिती दिली नाही. यावर पथकाचा संशय बळावल्याने त्यांनी त्याच्या ताब्यातील मोटारसायकल सांगाडा- इंजीन क्रमांच्या सहायाने तसेच भ्रमणध्वनीच्या आयएमईआय (IMEI) क्रमांच्या आधारे तांत्रीक तपास केला. यात नमूद चोरीचा माल हा उस्मानाबाद (श.)-1, उस्मानाबाद (ग्रा.)- 1, तामलवाडी पो.ठा.- 1 अशा चोरी- घरफोडीच्या 3 गुन्ह्यात चोरीस गेला असल्याचे निष्पन्न झाले. यावर पोलीसांनी अजय भोसले यास चोरीच्या मोटारासायकल, भ्रमणध्वनी व सुवर्ण दागिन्यांसह ताब्यात घेतले असून त्याच्या उर्वरीत साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत. 

From around the web