धाराशिवमधील लघु उद्योजकाची  संगमनेरच्या ठकसेनाकडून ४५ लाखाची फसवणूक 

 
crime

धाराशिव  : संगमनेर, जि. अहमदनगर येथील- अब्दुल हाफिज आब्दुल हमीद व्होरा, मोहमद अजिम अब्दुल हमीद व्होरा  यांनी  दि. 01.11.2020 ते आज पावेतो विमल टायर रिसायकलिंग एम आयडीसी येथे ज्योतिलींग रामचंद्र शिंदे यांना हाफीज व अजिम यांचे कडुन तिन हजार मैट्रीक टन माल देण्यासाठी 45,00,000 ₹ रक्कम हाफीज व अजिम यांच्या बॅक खात्यावर जाम केली. परंतू अद्यापही माल दिला नसुन रक्कम ही परत केली नाही. तरी हाफीज व अजिम यांनी ज्योतिलींग यांची फसवणूक केली. अशा मजकुराच्या ज्योतिलींग  शिंदे यांनी दि. 18.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


चोरीचे दोन गुन्हे दाखल 

वाशी : घाटीपिंपरी शिवारातील पवन चक्कीचे लाईटचे वायर अंदाजे 2,50,000₹ किंमतीचे तांब्याचे केबल अज्ञात व्यक्तीने दि. 11.05.2023 रोजी 19.00 ते 22.00 वा. सु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या महेंद्र रामलिंग लगाडे, सुपरवायझर रा. रत्नापूर, ता. कळंब यांनी दि. 18.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : भिमनगर, उस्मानाबाद येथील- रचना उज्वला चांदणे यांचे अंदाजे 45,000₹ किंमतीचे 15 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिणे हे दि.18.05.2023 रोजी 13.00 वा. सु.बसस्थानक उस्मानाबाद येथुन उस्मानाबाद ते सुरत बस मध्ये जसत असताना शांताबाई जाधव, लक्ष्मण जाधव, पुष्कराज वाकडकर, समाधान थोडसरे,गोवर्धनवाडी, ता. उस्मानाबाद, अक्षय डोलारे रा. घाटांग्री, ता. उस्मानाबाद यांनी चोरुन नेले. अशा मजकुराच्या रचना चांदणे यांनी दि. 18.05.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web