उस्मानाबादेत मांडूळाची तस्करी करणारे सहा जण गजाआड 

 
d

उस्मानाबाद  : उस्मानाबादेत मांडूळाची तस्करी करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. 

गोपनीय खबरे आधारे स्था.गु.शा. च्या सपोनि- निलंगेकर, पोउपनि- श्री माने, पोहेकॉ- जगदाळे, पोना- चव्हाण, ढगारे, ठाकूर, कोळी यांच्या पथकाने काल दि. 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 04.00 वा. साई हॉटेल समोरील सोलापूर- औरंगाबाद रस्त्यावरील उड्डान पुलाजवळ सापळा लावला. 

d

यावेळी अर्टीगा क्र. एम.एच. 15 ईएक्स 3216 ची पोलीसांनी संशयावरुन झडती घेतली असता गाडीतील 1) दिपक शिंदे 2) विजय कटारनवरे 3) सुशांत गायकवाड 4) संदीप लोखंडे, सर्व रा. नाशिक, 5) अब्दुल पटेल, रा. परंडा 6) रामा कांबळे, रा. उस्मानाबाद यांच्या ताब्यात एक मांडूळ साप आढळल्याने पथकाने सापासह नमूद सहा व्यक्तींना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोउपनि- पांडुरंग माने यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो.ठा. गु.र.क्र. 267 / 2021 हा वन्य जीव संरक्षण अधिनियम कलम- 39, 59 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web