धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या सहा घटना
![crime](https://osmanabadlive.com/static/c1e/client/83983/uploaded/9be70553204c845b4f37f33431cc5a5f.png)
उमरगा :फिर्यादी नामे- शिवानंद गुंडाप्प दळगडे, वय 65 वर्षे, रा. शिवपूरी कॉलनी, उमरगा, ता. उमरगा जि. उस्मानाबाद यांचे राहते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.23.07.2023 रोजी 11.00 ते दि. 24.06.2023 रोजी 07.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील रोख रक्कम 1,50,000 ₹,27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने 67,500 ₹व 15 तोळे चांदीचे दागिणे 4,500₹ असा एकुण 2,22,000 ₹ किंमतीचा माल हा चोरुन नेला. अशा मजकुराच्या शिवानंद दळगडे यांनी दि.28.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 454, 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- मारुती शरनाप्पा पिसे, वय 39 वर्षे, रा. शेकापूर, ता. जि. उस्मानाबाद यांचे मसोबा चौक खाजानगर वैष्णवी दुध डेअरीच्या खिडकीचे ग्रिल अज्ञात व्यक्तीने दि.27.07.2023 रोजी 23.00 ते दि. 28.06.2023 रोजी 07.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील ड्रावर मध्ये ठेवलेले रोख रक्कम 35,000 ₹ हे चोरुन नेली. अशा मजकुराच्या मारुती पिसे यांनी दि.28.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उस्मानाबाद शहर पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे- कुंडलिक केरबा कांबळे, वय 70 वर्षे, रा. जळकोट, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांचे हंगरगा शिवार शेत गट नं 293 मधील ईलेक्ट्रीक बोरचे सर्व्हिीस वायर 700 फुट अंदाजे 5,600 ₹ किंमतीचा हा दि. 19.07.2023 रोजी 22.00 ते दि.20.07.2023 रोजी 07.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या कुंडलिक कांबळे यांनी दि.28.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी : आरोपी नामे- चंद्रकांत श्रीपती डिसले, वय 44 वर्षे, रा. जवळगाव, ता. बार्शी जि. सोलापूर यांचे काटी शिवारातील शेतातील पत्रयाचे शेडचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.26.07.2023 रोजी 21.00 वा. सु ते दि.27.07.2023 रोजी 06.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन शेडमधील 8 शेळ्या अंदाजे 20,000₹ किंमतीच्या तसेच शेता शेजारील अशोक काळे यांचे 8 शेळ्या अंदाजे 20,000₹ किंमतीच्या अशा एकुण 40,000 ₹ किंमतीच्या 16 शेळ्या चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या चंद्रकांत डिसले यांनी दि.28.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 461, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तामलवाडी : फिर्यादी नामे- रामदास मारुती मगर, वय 33 वर्षे, रा. सांगवीकाटी, ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद यांची अंदाजे 70,000 ₹ किंमतीची होडां युनिकॉर्न मोटरसायकल क्र एमएच 25एवाय 5376 ही दि.27.07.2023 रोजी 20.30 ते दि.28.07.2023 रोजी 06.00 वा. सु. मगर यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या रामदास मगर यांनी दि.28.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी : फिर्यादी नामे- तानाजी भागवत घोगरे, वय 54 वर्षे, रा. स्नेहविकास कॉलनी, आनंदनगर उस्मानाबाद जि. उस्मानाबाद यांचे किणी शिवार शेत गट नं 166 मधील मोटरचे 700 फुट वायर अंदाजे 35,000 ₹ किंमतीचा हा दि. 13.07.2023 रोजी 12.30 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या तानाजी घोगरे यांनी दि.28.07.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.