शिराढोण :  मोटरसायकल अपघातात एक ठार 

 
crime

शिराढोण  : येल्डा, ता. अंबोजोगाई येथील- विठ्ठल बलभीम खोडवे, वय 40 वर्ष यांचा मुलगा व त्यांचा मित्र असे दि.31.12.2022 रोजी 20.00 वा. सु. कळंब ते लातूर जाणारे रोडवर दत्त मंदीरासमोर शिराढोण  येथे रोडने मोटरसायकल वरून जात होते. 

दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे निष्काळजीपने चालवल्याने 1.अशोक विठ्ठल खोडवे, वय 19 वर्षे रा. येल्डा, ता. अंबोजोगाई जि. बीड, 2. कृष्णा कुंडलिक गरदे, वय 18 वर्षे रा.गरदवाडी, ता. अंबोजोगाई जि. बीड, या दोघांना समोरून धडक दिली. यात अशोक व कृष्णा हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचे वडील- विठ्ठल खोडवे यांनी दि. 30.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ), सह मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हा दाखल 

 बेंबळी  :उजणी, ता. औसा येथील- बालाजी घटमोल, तर औसा, येथील- रसुल शेख, तर  तुळजापूर येथील- नागनाथ पारवे या तीघांनी दि. 30.01.2023 रोजी 11.45 ते 12.45 वा. सु. आपापल्या ताब्यातील अनुक्रमे ओमणी क्र. एम.एच. 12 एफ.वाय.8598, ॲटो रिक्षा क्र. एम.एच. 25 ए बी. 5479 व पिकअप क्र. एम.एच. 25 एजे 3947 ही वाहने बेबंळी येथे बोरखेडा जाणारे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायरीत्या उभे केलेले असताना बेबंळी पोलीसांना आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अंतर्गत बेबंळी पो.ठा. येथे स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.

 जुन्या भांडणाच्या कारणावरुन हाणामारी 

 तुळजापूर  : जुन्या भांडणाच्या कारणावरुन काक्रंबा, ता. तुळजापूर येथील- गितांजली शाहुराज पांडागळे यांना दि. 28.01.2023 रोजी 20.30 वा. सु. गावातील पाण्याची टाकीजवळ गावकरी-आशिष चंदनशिवे,प्रदिप चंदनशिवे, प्रतिक्षा चंदनशिवे, रेवप्पा चंदनशिवे, इंदुबाई चंदनशिवे,विकास चंदनशिवे  अन्य 3 यांनी संगणमताने गितांजली यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने, काठीने मारहान केली. विकास इतर दोघंनी तलवार हातात घेऊन येउन तुम्हा सर्वंना जिवे ठार मारुन टाकू अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या गितांजली पांडागळे यांनी दि.30.01.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506, सह भा. हा.का. कलम 4, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web