शिराढोण  : पोलीसांना अटक करण्यास मदत केली म्हणून एकाचा खून 

 
crime

शिराढोण : पोलीसांना अटक करण्यास मदत केली म्हणून  सहा ते सात जणांनी मिळून एकाचा खून केल्याची घटना  माळकरंजा, ता. कळंब येथे घडली. याप्रकरणी शिराढोण  पोलिसांनी गुन्हा दाखल  केला आहे. 

 माळकरंजा, ता. कळंब  येथील- आशाबाई महादेव काळे यांचे पती- महादेव हिरा काळे, वय 45 वर्षे, हे दि. 08.06.2023 रोजी सायंकाळी  06.00 वा. सु घरी असताना  विकास बब्रु काळे, सुरज पवार, गंगाराम पवार, बबलु पवार, खाज्या पवार व रवि काळेचा मुलगा या सर्वांनी या पुर्वीच्या केस मध्ये तु पोलीसांना आम्हाला का पकडून दिले या कारणावरुन महादेव यांना त्यांचे घरासमोर शिवीगाळ करुन दगडाने, मारहाण केली. व स्कारपिओ गाडीमध्ये घालून जिवे मारण्याच्या उद्देशाने घेवून गेले. व जिवे ठार मारुन  मंगरुळ पाटी येथे आणुन टाकले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी- आशाबाई काळे यांनी दि.09.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 302, 364, 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

हाणामारीचे तीन गुन्हे दाखल 

बेंबळी  : आंबेवाडी, ता. उस्मानाबाद येथील- गोविंद उर्फ रामकिसन मोरे  यांनी काही एक कारण नसताना दारुच्या नशेत जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने दि.30.05.2023 रोजी 08.30 वा.सु. आंबेवाडी शिवार मोरे  यांच्या शेतात गावकरी- बालाजी चंद्रकांत दरेकर यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, कुह्राडीने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या बालाजी दरेकर यांनी दि. 08.06.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम-  307, 323, 504 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

धाराशिव  : गांधीनगर, उस्मानाबाद येथील- शाहब कुरेशी, शारिफ कुरेशी यांनी विकत दिलेल्या कोबंडयाचे पैसे मागण्याचे कारणावरून दि.05.06.2023 रोजी 19.30 वा.सु.देशपांडे स्टॅन्ड उस्मानाबाद येथे सागर चिकन स्टॉल समोर गावकरी- अफजल बशीर कुरेशी यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, सत्तुरने  मारहान  करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या अफजल कुरेशी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम- 326, 324, 504, 34 अंतर्गत गुन्हा दि. 08.06.2023 रोजी नोंदवला आहे.

नळदुर्ग : येवती, ता. तुळजापूर येथील- अरुण ढोले, सुरेश ढोले, गंगाधर ढोले, चिमाबाई ढोले, अमोल कचरे व अन्य 2 या सर्वांनी पिकअपचा धक्का कापड दुकानाला लागल्याचे कारणावरून दि.07.06.2023 रोजी 19.30 वा.सु.येवती येथे कापड दुकानासमोर गावकरी- किरण दादाराव ढोले यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहान  करुन  जखमी केले. तसेच किरण यांचा भाउ रविंद्र हा त्यांचे बचावास आले असता त्यासही लाथाबुक्यांनी, दगडाने मारहान केली. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. ,,  अशा मजकुराच्या किरण ढोले यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.सं. कलम-  324,323, 143, 147,148,149, 504, 506 अंतर्गत गुन्हा दि. 08.06.2023 रोजी नोंदवला आहे.
 

From around the web