शिराढोण : अपत्य जन्माची लपवणूक करुन विल्हेवाट लावणाऱ्यावर गुन्हा दाखल
शिराढोण : अपत्य जन्माची लपवणूक व्हावी व अर्भकाचा मृत्यु व्हावा या अवैध उद्देशाने एक स्त्री जातीचे अर्भक देवधानोरा येथील पुर्वी नदीजवळील कडेला अज्ञात व्यक्तीने टाकले असल्याचे देवधानोरा, ता. कळंब येथील गावकरी- बबन थोरात यांना दि. 31.01.2023 रोजी 20.00 वा. सु. आढळले. अशा मजकुराच्या बबन थोरात यांनी दि. 01.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 318 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
धोकीजवळ अपघात
ढोकी : ढोकी, ता. उस्मानाबाद येथील- सचिन आबा चव्हाण, वय 28 वर्षे हे दि.15.01.2023 रोजी 16.00 वा. सु. मोटरसायकल क्र. एम.एच. 25 एएन 2966 वर बसून जात होते. दरम्यान कोल्हेगाव येथील कुभांर वस्तीजवळ अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्र एमएच 25 एडी 2426 हा निष्काळजीपने चालवून सचिन च्या मोटरसायकलला कट मारुन पाठीमागील ट्रॉलीची धडक बसल्याने. त्यात सचिन हा गंभीर जखमी होवून मयत झाला. अशा मजकुराच्या मयताचा भाउ- अनिल चव्हाण यांनी दि.01.02.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184,134(अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.